येतोय 'सूर्यवंशी'! रोहित शेट्टीबरोबर आता अक्षयकुमार घालणार धुमाकूळ

Tuesday, 5 March 2019

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा थ्रिलींग आणि अॅक्शनपट आपल्यासमेर आणण्यासाठी सज्ज झालाय. 'सिंबा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमार एकत्र येऊन 'सूर्यवंशी' हा पोलिसांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगण हे कॅमिओ रोलमध्ये दिसतील. 

सिंबामध्ये अक्षय कॅमिओ रोलमध्ये दिसला होत. त्यातच त्याने 'सूर्यवंशी'ची झलक दिली होती. आज 'सूर्यवंशीचे' पोस्टर लॉन्च झाले असून तो एका भारदस्त पोलिसाच्या लूकमध्ये दिसत असून, यात चित्रपटात पोलिसांची शौर्यगाथा सांगितली जाईल.

आज 'सूर्यवंशी'चे पोस्टर लॉन्च झाल्यानंतर काही वेळातच #Sooryavanshi हा हॅशटॅग सुरू झाला आहे. अक्षय कुमारने ट्विट करत 'सूर्यवंशी'ची फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अक्षय कुमार सध्या 'केसरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून एप्रिल पासून सूर्यवंशीचे चित्रीकरण सुरू होईल अशी माहिती आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sooryavanshi hindi movie poster launch