esakal | सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर साकारणार मुख्य भूमिका?
sakal

बोलून बातमी शोधा

सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर साकारणार मुख्य भूमिका?

सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर साकारणार मुख्य भूमिका?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन यांसारख्या क्रिकेटर्सच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातच आता भारताचा लाडका माजी कर्णधार सौरव गांगुलीची Sourav Ganguly भर पडली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यास होकार दिला आहे. विशेष म्हणजे, हा बायोपिक बिग बजेट असून २०० ते २५० कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात येणार असल्याचं समजतंय. मोठ्या पडद्यावर सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार, यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात होते. हृतिक रोशनच्या नावाचीही चर्चा होता. मात्र आता या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर Ranbir Kapoor गांगुलीची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. (Sourav Ganguly biopic confirmed Will Ranbir Kapoor play Dada on screen slv92)

'न्यूज १८ बांग्ला' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली म्हणाला, "होय, मी बायोपिकसाठी होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये असेल पण मी आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं नाव जाहीर करू शकत नाही." या बायोपिकच्या पटकथालेखनावर सध्या काम सुरू झाल्याचं असून प्रॉडक्शन हाऊसने दोन-तीन वेळा गांगुलीची भेट घेतली. प्रॉडक्शन हाऊसनेच रणबीरचं नाव भूमिकेसाठी ठरवलं असून त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

याआधी नेहा धुपियाच्या शोमध्ये सौरव गांगुलीने हजेरी लावली होती. तेव्हा हृतिक रोशन भूमिका साकारण्यावर तो म्हणाला होता, "त्याला माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल. अनेकजण म्हणतात की हृतिक दिसायला हँडसम आहे, मस्क्युलर आहे. लोक म्हणतात की हृतिकसारखी बॉडी असली पाहिजे. मात्र मी हृतिकला म्हणेन की जर त्याला माझ्या बायोपिकमध्ये काम करायचं असेल तर त्याला सगळ्यात आधी माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल."

loading image