Ajith Kumar: साऊथ सुपरस्टार अजिथ कुमारला पितृशोक, वडिलांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajith kumar, ajith kumar news, ajith kumar father passed away, P Subramaniam

Ajith Kumar: साऊथ सुपरस्टार अजिथ कुमारला पितृशोक, वडिलांचं निधन

Ajith Kumar Father Passed Away: अभिनेता अजित कुमारचे वडील पी सुब्रमण्यम मणी यांचे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी झोपेतच निधन झाले. पी सुब्रमण्यम दीर्घकाळापासून वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. ते ८५ वर्षांचे होते.

लोकांची गर्दी होऊ नये म्हणुन त्यांच्या निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले - अभिनेता अजित, अनिल आणि अनुप असा परिवार आहे.

(south actor ajith kumar father P Subramaniam passed away the age of 85)

अजितच्या फॅन क्लब पेजने कुटुंबाकडून एक स्टेटमेंट शेअर केले आहे. त्यात लिहिले होते, “आमचे वडील पीएस मणी यांचे आज पहाटे झोपेत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांची आणि आमच्या कुटुंबाची अनेक डॉक्टरांनी घेतलेली काळजी आणि मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, विशेषत: चार वर्षांपूर्वी त्यांना झालेल्या दुर्बल स्ट्रोकनंतर आज त्यांचे निधन झाले."

याशिवाय कुटुंबातून आलेल्या निवेदनात असेही लिहिले आहे की, "पी सुब्रमण्यम यांचे अंतिम संस्कार हे कौटुंबिक स्वरूपाचे असतील.

आम्हाला विश्वास आहे की त्यांचे हितचिंतक आणि इतर माणसं सर्वजण घरी न येता खाजगीरित्या शोक व्यक्त करून आमच्या भावनांचा आदर करतील आणि कोणताही गोंधळ न करता त्यांच्या निधनाला शक्य तितक्या सन्मानाने सामोरे जातील."

असं स्टेटमेंट अनुप कुमार, अजित कुमार, आणि अनिल कुमार या तीन मुलांनी कुटुंबातर्फे दिलंय.

अजिथ कुमारच्या अनेक फॅन्सनी, सहकलाकारांनी आणि सेलिब्रिटींनी अजिथ कुमारच्या कुटुंबाबद्दल हळहळ व्यक्त करून शोक व्यक्त केलाय. अजिथ कुमार हा साऊथ सुपरस्टार असून त्याचे वल्लीमइ, थुनिवू, वेडालम असे सिनेमे सुपरहिट झाले आहेत.

टॅग्स :Marathi News Bollywood