हृतिक 'राम'  दीपिका 'सीता'; साऊथमधील महेशबाबुही 'रामायणात'

 south actor mahesh babu in ramayana movie deepika play seeta hrithik roshan look in bhagwan ram
south actor mahesh babu in ramayana movie deepika play seeta hrithik roshan look in bhagwan ram

मुंबई - आदीपुरुष नंतर आता रामायण नावाच्या चित्रपटाचा चांगलाच बोलबाला झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आदीपुरुषचे शुटिंग झाले होते मात्र त्याच्या सेटला आग लागल्यानं त्यात खंड पडला आहे. याअगोदर तो त्याच्यातील वादग्रस्त कथेमुळे अनेकांच्या टीकेचा विषय झाला होता. काही राजकीय पक्षांनी त्या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आता नव्यानं येणा-या रामायण चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

सोशल मीडियावर रामायण नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. चालू वर्षातील बिग बजेट मुव्ही म्हणूनही या चित्रपटाचा उल्लेख होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असून त्याची निर्मिती मधु मंटेना यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची एण्ट्री झाली आहे.

‘रामायणा’ पूर्वी दीपिका आणि हृतिक ही जोडी ‘फायटर’ या चित्रपटात  दिसणार आहे. काही दिवसांपासून ‘रामायण’ या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर बोलले जात होते.  या चित्रपटाचे बजेट तीनशे कोटींपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. ‘रामायण’ या चित्रपटात दीपिका  सीतेच्या भूमिकेत दिसणार होती तर हृतिक रोशन प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार होता.  एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार महेश बाबूला चित्रपटाची कथा आवडली होती. मात्र त्यावर आपण काम करणार की नाही हे सांगितलेलं नाही. त्यामुळे महेश बाबू चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com