
Dhanush: रजनीकांतचा जावई धनुषच्या दुसऱ्या लग्नाचे वारे लागले वाहू?
चित्रपटसृष्टीत कायम ब्रेकअप, घटस्फोट, भांडणं अशा अनेक चर्चा रंगलेल्या असतात. तसेच या प्रकरणांची चर्चा चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगलेली असते. मात्र आता चर्चा रंगत आहे दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा जावई आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष याच्याबद्दल. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि यांचा घटस्फोट झाला आहे.
दोघांनी १८ वर्षाचा सुखी संसार केल्यानंतर गेल्या वर्षी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. धनुष घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. अभिनेता नक्की कोणासोबत लग्न करणार याबद्दल चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, दुसरे लग्न करण्यासाठी धनुष याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे का? यांसारख्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्याळम अभिनेत्री मीनाबरोबर धनुष लग्न करणार असल्याची चर्चा आहे. धनुषने दुसऱ्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. धनुषच्या लग्नाबद्दल अभिनेता बलवाने याने मोठा खुलासा केला आहे.
बलवाने याने लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. बलवानने सध्या धनुष लग्नाची तयारी करत असल्याचा खुलासा केला आहे. सध्या सगळीकडे धनुष आणि मल्याळम अभिनेत्री मीना यांच्या लग्नाची तुफान चर्चा सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे अभिनेत्री मीनाचे देखील हे दुसरे लग्न आहे. तसेच अभिनेत्रीला एक मुलगी देखील आहे.
धनुषसोबत मीनाचे देखील हे दुसरे लग्न असणार आहे. पहिली पत्नी ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या घटस्फोटानंतर देखील अनेक ठिकाणी मुलांसाठी एकत्र आले. चाहत्यांना दोघांच्या घटस्फोटानंतर खूप मोठा धक्का बसला होता. मध्यंतरी धनुष आणि ऐश्वर्या मुलांसाठी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी देखील सुरु होती. आता धनुषच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सगळीकडे सुरु आहेत.