Lee Jihan Death: कोरियन संगीत चाहत्यांना मोठा धक्का! प्रसिद्ध गायकानं घेतला अखेरचा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lee Jihan Death:

Lee Jihan Death: कोरियन संगीत चाहत्यांना मोठा धक्का! प्रसिद्ध गायकानं घेतला अखेरचा श्वास

Actor singer Lee Jihan dead Halloween: जगभरात कोरियन संगीत, बँड आणि चित्रपट यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेता, गायक ली जिहानची हॅलोविनचा चेंगराचेंगरीत मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे,. त्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथ कोरियातील हॅलोविन प्रकरण हे चर्चेत आले आहे.

साऊथ कोरियन गायक ली जिहानचा मृत्यु ही एक हत्या असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या हॅलोविनच्या सोहळ्यात प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. त्यात ली जिहानचा गुदमरुन मृत्यु झाला आहे. ली जियान हा अवघ्या 24 वर्षांचा होता. त्याची प्रसिद्धी अमाप होती. कमी वयातच त्यानं जगभरामध्ये मोठे नाव कमावले होते. त्यामुळे त्याच्या जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे जाणे त्याच्या फॅन्ससाठी क्लेशकारक ठरले आहे.

हेही वाचा: Malaika Arora : हॉट मलायकाचा बोल्ड लूक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ली जिहानच्या मृत्युची चौकशी होणार आहे. जगभरामध्ये आपल्या वेगवेगळ्या म्युझिकल अल्बममुळे ली जिहान हा चर्चेत आला होता. त्याचे जगभरातील अनेक देशांमध्ये कॉन्सर्टही झाले होते. त्याला मिळालेला प्रतिसादही कमालीचा होता. असे त्याच्या फॅन्सनं म्हटले होते. गेल्या काही वर्षांपासून जगभरातून कोरियन म्युझिकल बँड, चित्रपट यांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. ली जिहान हा 101 कोरियन कॉम्पिटिशन सिंगिग बँडमधील माजी गायक होता. असेही म्हटले जाते. त्याच्या जाण्यानं चाहत्यांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा: Shweta Tiwari: वय नाही 'सौंदर्य' पाहायचं!