सुपरस्टार चिरंजीवींना कोरोना: Jr.NTR कडून चिंता व्यक्त

सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Tollywood Superstar Chiranjeevi
Tollywood Superstar Chiranjeevi

Superstar Chiranjeevi: साऊथमध्ये (Tollywood Movies) आपल्या प्रचंड लोकप्रियतेनं चाहत्यांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते म्हणून चिरंजीवींच्या (Actor Chiranjeevi) नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेते चिरंजीवी यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेयर (Share Social Media Post) करुन माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. असंही त्यांनी कळवलं आहे.

माझ्या सर्व प्रिय मित्रांना मला सांगायला हवे की, मला कोरोना झाला आहे. दरम्यानच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे. आणि उपचार घ्यावेत. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलीवूडमध्ये देखील अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती

Tollywood Superstar Chiranjeevi
Video: 'पद्मश्री' नीरज चोप्राची कॅलिफोर्नियावरून आली प्रतिक्रिया

सध्या चिरंजीवी हे होम क्वॉरनटाईन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चिरंजीवी यांच्या त्या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुम्ही लवकर बरे व्हा. ज्युनिअर एनटीआर याने देखील चिरंजीवी यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमीक्रॉन नावाच्या नव्या स्ट्रेननं अनेकांची डोकेदुखी वाढवली आहे.

Tollywood Superstar Chiranjeevi
RRR ची रिलिज डेट ठरली आता या दिवशी होणार प्रदर्शित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com