esakal | पतीमध्ये 'प्रॉब्लेम' अभिनेत्रीचा तिसऱ्यांदा घटस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

पतीमध्ये 'प्रॉब्लेम' अभिनेत्रीनं घेतला तिसऱ्यांदा घटस्फोट

पतीमध्ये 'प्रॉब्लेम' अभिनेत्रीनं घेतला तिसऱ्यांदा घटस्फोट

sakal_logo
By
टीम सकाळ

मुंबई - कोणत्याही कारणावरुन घटस्फोट घेण्याचे प्रकार हे काय फक्त बॉलीवू़डमध्येच होतात असे काही नाही. आता एक प्रकरण समोर आलं आहे. ते आहे बांग्ला चित्रपट विश्वातील. त्या देशातील एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या तिसऱ्या घटस्फोटावरुन चर्चेत आली आहे. त्या घटस्फोटाचे कारण तिनं पतीमधील असणाऱ्या फिजिकल रिलेशनशीपचं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला वेगवेगवेळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहे. त्या अभिनेत्रीचं नाव श्राबंती चॅटर्जी असं आहे. ती यापूर्वी देखील हटके कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे ती जास्त लोकप्रिय झाली आहे. 34 वर्षाच्या या अभिनेत्रीनं 1997 मध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं.

श्राबंतीनं आतापर्यत तीन लग्न केली आहेत. तिचं पहिलं लग्न हे बांग्ला फिल्ममेकर राजीव कुमार यांच्यासोबत झालं होतं. 2003 मध्ये हे लग्न झालं. 2016 मध्ये तिनं राजीवकडून घटस्फोट घेतला. त्यानंतर तिनं कृष्ण ब्रजसोबत लग्न केलं. एक वर्ष हे लग्न टिकलं. श्राबंतीनं एप्रिल 2019 मध्ये रोशन सिंग यांच्याशी लग्न केलं. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे की, श्राबंतीनं 16 सप्टेंबरला कोर्टात रोशन सिंगच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला त्याच्याकडून घटस्फोट हवा आहे. असेही तिनं म्हटलं आहे. यावरुन हे प्रकरण टोकाला गेलं आहे असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. रोशन यांनी सांगितलं आहे की, अजून आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. मात्र जर ती मिळाली तर त्यावर योग्य तो विचार करुन उत्तर देऊ असं त्यांनी सांगितलं आहे.

यासगळ्या प्रकरणावर रोशन सिंग यांनी एका बांग्ला वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितलं की, श्राबंती ही तिच्या अनेक मित्रांच्या संपर्कात आहे. आणि त्या मित्रांमध्ये तिनं माझ्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी पसरवल्या आहेत. ज्यामुळे मी अनेकदा अडचणीत आलो आहे. त्याविषयी तिला विचारणा केली असता त्याबद्दल आपण असे काही केलंच नसल्याचे ती सांगते. त्यामुळे अनेकदा आमच्यात वादही झाले आहेत. आमच्यातील फिजिकल रिलेशनशिपविषयी तिनं काही गोष्टी सोशलाईज केल्या आहेत. ज्या तिनं करायला नको होत्या. मात्र तिच्या चाहत्यांना याविषयी काही माहिती नाही.

हेही वाचा: काय कपडे घातलेत प्रियंका, शोभतं का? 

हेही वाचा: सलमान खानमुळे 'या' अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव

loading image
go to top