Aai Kuthe Kay Karte: “श्रद्धा आणि सबुरी”! ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे 1000 एपिसोड पुर्ण, मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

 Aai Kuthe Kay Karte 1000 episode Celebration
Aai Kuthe Kay Karte 1000 episode CelebrationEsakal

Aai Kuthe Kay Karte 1000 episode Celebration: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय.

गेल्या ३ वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आई कुठे काय करते मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय आणि आजही मालिका तितकिच लोकप्रिय आहे. आई कुठे काय करते मालिकेचा 1000 वा भाग काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. 7 डिसेंबर 2019 मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.

 Aai Kuthe Kay Karte 1000 episode Celebration
Gadar 2 Box Office Collection Day 9: 'गदर2' ऐकेना काही केल्या थांबेना! दुसऱ्या शनिवारी कमाईचा आलेख उंचावला..

तेव्हा पासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत टीआरपीच्या लिस्टमध्ये पहिल्या तीन स्थानावर ठाण मांडून बसली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेचे 1000 भाग पुर्ण झाल्याचा आनंद मालिकेच्या टिमने साजरा केला. मालिकेच्या टिमने यावेळी केक कापुन सेलिब्रेशन केलं. मालिकेत अनिरुद्धची भुमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यासोबत एक पोस्टही टाकली आहे.

या पोस्टमध्ये ते लिहितात, 'श्रद्धा आणि सबुरी, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाले आहेत. 7- 12-19 रोजी या मालिकेचे शूटिंग सुरू केलं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते, पण वाटत नक्की होतं की ही सिरीयल खूपच लोकांना भावेल, त्याचं मुख्य कारण म्हणजे या सिरीयलच्या नावामध्ये 'आई' या शब्दाचा उल्लेख आहे, आणि दुसरं कारण होतं राजनजी शाही. डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चे सर्वेसर्वा राजनजी, हे आम्हाला प्रोड्युसर लाभले होते, नमिता वर्तक म्हणजेच कमलाकर नाडकर्णी यांची कन्या, जिने खरंतर मला या सिरीयल साठी माझी “अनिरुद्ध देशमुख” या पात्रासाठी निवड केली.

उत्कृष्ट इतर सगळे कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शनाची टीम, उत्कृष्ट सेटिंग, उत्कृष्ट लेखन, सगळंच या सिरीयल मधलं भारी होतं, स्टार प्रवाह चॅनल ने सुद्धा सिरीयलचे प्रमुख उत्कृष्ट केले होते, पहिल्या दिवसापासूनच लोकांच्या मनामध्ये ही सिरीयल बसली.'

 Aai Kuthe Kay Karte 1000 episode Celebration
Banita Sandhu AP Dhillon: श्रीदेवीच्या लेकीला नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय रॅपर एपी ढिल्लन

पुढे ते लिहितात, 'खरंतर मी एक ऑड मॅन आऊट होतो, मी जे कॅरेक्टर करत होतो अनिरुद्ध देशमुख नावाचं, ते सुद्धा ऑड मॅन आऊट आहे. पहिल्यांदा ज्यावेळेला नमिताने माझी राजन शाही यांच्याशी ओळख करून दिली, त्यावेळेला माझ्याविषयी त्यांच्या डोळ्यांमध्ये मला फार काही आत्मविश्वास दिसला नाही, तसं ते मला काही बोलले नाहीत तरी, पहिल्या भेटीत मला ते जाणवलं होतं, पण त्यांचा नमितावर खूप कॉन्फिडन्स होता आणि तिच्यावर खूप विश्वास होता, आणि म्हणून खरंतर माझं कास्टिंग या इतक्या भारी रोल साठी झालं.

'श्रीमोई' नावाच्या बंगाली मालिकेचं हे सुरुवातीला रूपांतरण होतं, त्यामध्ये जो अनिरुद्ध देशमुख होता, तो अगदी भारदस्त व्यक्तीमहत्त्व होतं, त्याचे काही episodes मला राजनजींनी पाहायला सांगितले होते, ते भाग पाहिल्यानंतर मी जरा घाबरलोच होतो, अमरीश पुरी सारखी त्याची पर्सनॅलिटी होती.

टिमने मला सांभाळून घेतलं, एक हजार एपिसोड नंतर सुद्धा मला सांभाळून घेत आहेत, त्यांनी एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख माझ्याकडून करून घेतला, या आई कुठे काय करते च्या टीमने. DKP राजन जी, स्टार प्रवाह पासून आमच्या अगदी स्पोर्ट बॉय पर्यंत सगळ्यांचा मी ऋणी आहे सगळ्यांचा मी आभारी आहे ! आज सेटवर छान हवन पूजा झाली, 1000 एपिसोड चा केक आज आम्ही कापला."

 Aai Kuthe Kay Karte 1000 episode Celebration
Baipan Bhaari Deva: "मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन पण..." दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितली मनातली खंत

आता मिलिंद यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी त्यांच्या पोस्टला कमेंट करत आहेत. त्यांचे आणि पुर्ण टिमचे कौतुक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com