Aai Kuthe Kay Karte: १००० भागांची झाली 'आई', आज विशेष भाग प्रदर्शित

आई कुठे काय करते मालिकेचा आज १००० वा भाग प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना आनंद झालाय.
 aai kuthe kay karte, aai kuthe kay karte 1000 episode, marathi serial, star pravah
aai kuthe kay karte, aai kuthe kay karte 1000 episode, marathi serial, star pravahSAKAL

Aai Kuthe Kay Karte 1000 Episode Complete News: आई कुठे काय करते ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका.

आई कुठे काय करते गेली ३ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आई कुठे काय करते मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय.

या मालिकेविषयी एक मोठी अपडेट समोर आलीय. आई कुठे काय करते मालिकेचा आज १००० वा भाग प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना आनंद झालाय.

(star pravah Aai Kuthe Kay Karte marathi serial 1000 Episode Complete News)

 aai kuthe kay karte, aai kuthe kay karte 1000 episode, marathi serial, star pravah
Ajaz Khan: बिग बॉस-फेम टीव्ही अभिनेता एजाज खान याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर

आई कुठे काय करते मालिका सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत आहे मधुराणी प्रभुलकर.

याशिवाय मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. अप्पांच्या भूमिकेत किशोर महाबोले तर कांचनताईंच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर झळकत आहेत.

 aai kuthe kay karte, aai kuthe kay karte 1000 episode, marathi serial, star pravah
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध वीणाला केक भरवायला गेला पण वीणाने असं सुनावलं की तोंडावर पडला

आई कुठे काय करते मालिकेत आजवर अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले. मालिकेचं कथानक थोडक्यात सांगायचं तर.. अरुंधती ही मध्यमवर्गीय गृहिणी तिचा नवरा, तीन मुलं, सासू सासऱ्यांसोबत राहत असते.

लग्नाच्या २५ वर्षानंतर अरुंधतीला कळतं की अनिरुद्ध म्हणजेच तिच्या नवऱ्याचं संजना सोबत अफेयर आहे. ती अनिरुद्ध आणि संजनाला एका वेगळ्या अवस्थेत बघते ज्यामुळे अरुंधतीच्या पायाखालची जमीन सरकते.

पुढे अरुंधती अनिरुद्ध पासून घटस्फोट घेते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते. पुढे अनिरुद्ध संजना सोबत लग्न करतो. अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष होतो. आशुतोष आणि अरुंधती कॉलेजच्या काळात एकत्र असतात.

अरुंधती - आशुतोष मध्ये मैत्री वाढते. दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं आणि दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेतात. या लग्नाला अनिरुद्ध आणि देशमूख कुटुंब विरोध करतात.

परंतु सर्वांच्या विरोधाला डावलून अरुंधती - आशुतोष लग्न करतात. सध्या मालिकेत अरुंधतीची लेक इशाचा साखरपुडा झालाय.

याशिवाय अरुंधती आता परदेशवारी करणार आहे. आशुतोषची बहीण वीणाची मालिकेत एंट्री झालीय. वीणा आणि अनिरुद्ध बिझनेस पार्टनर झाले आहेत.

आज मालिकेचा १००० वा भाग प्रदर्शित होतोय. पुढेही अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com