'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवं वळण.. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

star pravah tujhech mi geet gaat aahe serial new twist will swara meet her father

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवं वळण.. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि..

tujhech mi geet gaat aahe : स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (star pravah tujhech mi geet gaat aahe serial new twist will swara meet her father)

चिमुकल्या स्वराने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलं. एकीकडे आईला गमावल्याचं दु:ख तर दुसरीकडे मामीकडून होणारा जाच. यासर्वात स्वराने मामाच्या सांगण्यावरुन वेष बदलून बाबांचा शोध घेण्यासाठी मुंबई गाठली. मायानगरी मुंबईत वडिलांचा शोध घेण्यासोबतच स्वराचा जगण्यासाठीही संघर्ष सुरु झालाय. रहायचं कुठे हा प्रश्न तर आहेच. मात्र पोट भरण्यासाठीही तिला बरीच धडपड करावी लागतेय. बाबांची लवकरात लवकर भेट व्हावी अशी तिची इच्छा असतानाच योगायोगाने साईबाबांच्या मंदिरात स्वरा आणि तिचे बाबा एकत्र येतात. मंदिरात दोघं एकत्र येतात खरे पण बाप-लेकीची भेट होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे.

ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त रिअल लोकेशनचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सीनसाठी एक खास गाणं बनवण्यात आलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं असून कौशल इनामदार यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे शब्द हेमंत सोनावणे आणि दीप्ती सुर्वे यांच्या लेखणीतून उतरले आहेत.

Web Title: Star Pravah Tujhech Mi Geet Gaat Aahe Serial New Twist Will Swara Meet Her Father

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Serialstar pravah