अबब...कोरोना विरोधातील लढाईसाठी बॉलिवूडकरांना जमविला एवढा निधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

ऑनलाईन 'आय फॉर इंडिया' नावाच्या कार्यक्रमाचे बॉलिवूडकरांनी आयोजन केले. आणि या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून साऱ्यांच कलाकारांनी सहभागी घेतला. या कार्यक्रमाने जवळपास 52 कोटी रुपयांचा फंड जमा केला आहे.

मुंबई ः कोरोना विरोधातील लढाई आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जिंकू आणि लवकरात लवकर देश कोरोनामुक्त करू, असे सेलिब्रिटी मंडळी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. कोरोना विरोधातील लढाईत आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस यांना कलाविश्वातील मंडळी वारंवार मदत करत आहेत. तसेच  त्यांच्याप्रती असणारं प्रेम, अभिमानही वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. गरजूंना, कामगारांना मदत करण्यासाठी तर बॉलिवूडकर पुढे सरसावले आहेत. 

हे ही वाचा - बच्चे कंपनीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवा खजिना

आता तर बॉलिवूडकरांनी एक नवा विक्रम केला आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी साऱ्यांनी एक येऊन कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. बॉलिवूड कलाकारांनी कोरोना विरोधातील लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून एक नवा मार्ग निवडला. ऑनलाईन 'आय फॉर इंडिया' नावाच्या कार्यक्रमाचे बॉलिवूडकरांनी आयोजन केले. आणि या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून साऱ्यांच कलाकारांनी सहभागी घेतला. या कार्यक्रमाने जवळपास 52 कोटी रुपयांचा फंड जमा केला आहे.

एका कार्यक्रमातून जमा झालेली ही रक्कम फारच मोठी आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये फायदेशीर ठरणारी आहे. फेसबुक मार्फत जवळपास 4 कोटी रुपये तर कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकं आणि इतरांनी जवळपास 47 कोटींपेक्षा अधिक निधी दान केला आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरुच आहे. असे करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले आहे. कलाकारांनी या कार्यक्रमामार्फत इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले होते. 

'आय फॉर इंडिया' या कार्यक्रमासाठी बॉलिवूडमधील सारे कलाकार एकवटले होते. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, टायगर श्रॉफ, आमिर खान, परिणीती चोप्रा, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, ऐश्वर्या राय बच्चन, वरुण धवन यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाकारांनी विविध प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

गाणी गात, कॉमेडी करत, कवितांचे वाचन करत तसेच विविध प्रकारचे वाद्य वाजवत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामधून करण्यात आला. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. फेसबुकच्या माध्यमातून  'आय फॉर इंडिया' चे प्रसारण करण्यात आले.

कलाकारांनी घरच्या घरी आपला व्हिडिओ शूट करत यामध्ये सहभाग घेतला होता. करण जोगर आणि जोया अख्तरने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चार कोटीपेक्षा अधिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून बॉलिवूडकरही भारावून गेले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामधून जमा झालेला फंड पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय बॉलिवूडकरांनी घेतला आहे.  

star studded digital concert i for india raises over rs 52 crore for covid 19 relief


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: star studded digital concert i for india raises over rs 52 crore for covid 19 relief