सलाम महादेवभाई...!

सलाम महादेवभाई...!

महादेवभाई देसाई हे महात्मा गांधीजींचे सचिव. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर गांधी विचारांनी प्रेरित होऊन ते महात्मा गांधींच्या सान्निध्यात आले आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिले. त्यांनी जी रोजनिशी लिहिली. त्या रोजनिशीवर आधारित एकपात्री नाटक लिहिले ते रामू रामनाथन यांनी. येथील डॉ. माया पंडित यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आणि या नाटकाचे अभिवाचन सर्वत्र सुरू झाले.

येथील प्रत्यय नाट्य हौशी कला केंद्राने केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर राज्यभरात पंधराहून अधिक ठिकाणी या नाटकाचे अभिवाचन केले. एकपात्री नाटकाचे प्रयोग यापूर्वीही अनेक ठिकाणी झाले; पण राज्य नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रावर गेली सलग दोन वर्षे या नाटकाचे प्रयोग झाले.

केवळ अभिवाचनापुरता हा विषय मर्यादित न राहता दोन अंकी नाटकातून तो रसिकांपर्यंत पोचवण्याचा संकल्प ‘प्रत्यय’च्या टीमनं यंदा केला आणि तो यशस्वीही केला. येथील केंद्रावर मंगळवारी या नाटकाचा एक देखणा सामूहिक आविष्कार अनुभवायला मिळाला. 

महादेवभाईंनी सुमारे २७ रोजनिशी लिहिल्या. त्यातून केवळ त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयीच नव्हे तर एकूणच स्वातंत्र्यलढा, त्यातील महात्मा गांधी यांच्याविषयीच्या विविध नोंदी, सविनय कायदेभंग, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू असोत किंवा इतर क्रांतिकारक यांच्याशी झालेले संवाद असोत किंवा मिठाचा सत्याग्रह...एकूणच स्वातंत्र्यलढ्यातील एकेक सुवर्णपान त्यातून उलगडत जाते.

१९१७ ते १९४२ हा पंचवीस वर्षांचा काळ म्हणजे तसा स्वातंत्र्यलढ्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ. याच काळात महादेवभाई आणि महात्मा गांधी यांची साथ कधीच सुटली नाही. एकूणच नाटकातून महादेवभाईंचा शोध घेताना ‘प्रत्यय’ची टीम कुठेच कमी पडत नाही. दिग्दर्शक सुहास लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रत्यय’च्या उमद्या शिलेदारांनी महादेवभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू तितक्‍याच ताकदीने रसिकांसमोर आणले. 

पात्र परिचय 
 रोहित पोतनीस (निवेदक)  समीर पंडितराव (महादेवभाई)  विकास गुळवणी (महात्मा गांधी)  मिलिंद इनामदार (दादाजी)  मिथिल रणवरे (मोहम्मद जिना व म्हातारा)  स्वरूपा फडके (प्रीसिला मॅडम) 
 अभिजित देसाई (नरहरी पारिख)  सुहास लकडे (डॉ. आंबेडकर)
 समर्थ गोडवे (पंडित नेहरू)  शुभम पोतदार (छोटा भाऊ)  विक्रांत कुंभार (सरदार पटेल)  प्रणोती कुमठेकर (कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू)  शर्वरी जोग (दुर्गाबेन)  आकाश कुलकर्णी  प्रतीक गोरनाळे  संदीप चिपरे  निकिता घुगे (शेतकरी व कार्यकर्ते)

 दिग्दर्शक ः सुहास लकडे
 पार्श्‍वसंगीत ः नरहर कुलकर्णी, सिध्दित नाबर
 प्रकाशयोजना ः शंतनू पाटील
 नेपथ्य ः स्वरूपा फडके
 रंगभूषा ः सुनील मुसळे
 वेशभूषा ः अनुया नागवेकर
 रंगमंच व्यवस्था ः राकेश कोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com