एक सुंदर नाट्यानुभव...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

राज्य नाट्य स्पर्धेत तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बॅनरखाली इरफान मुजावर लिखित ‘नंगी आवाजे’ या नाटकाचा सुंदर अनुभव दिला. मानवी भाव-भावनांचा कल्लोळ हा आजवर अनेक नाटकांचा विषय राहिला आहे. तो मांडण्याचा आशय आणि सादरीकरणाचा फॉर्म प्रत्येकाचा वेगवेगळा.

राज्य नाट्य स्पर्धेत तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बॅनरखाली इरफान मुजावर लिखित ‘नंगी आवाजे’ या नाटकाचा सुंदर अनुभव दिला. मानवी भाव-भावनांचा कल्लोळ हा आजवर अनेक नाटकांचा विषय राहिला आहे. तो मांडण्याचा आशय आणि सादरीकरणाचा फॉर्म प्रत्येकाचा वेगवेगळा.

इरफान मुजावर यांनी शरिरसुखावर बेतलेलं आणि तितकचं अस्वस्थ करणारं कथानक ‘नंगी आवाजे’ या नाटकातून मांडलं आहे. ते तितक्‍याच ताकदीनं तुकाराम माळी तालीम मंडळाच्या टीमनं सादर केलं. सिध्दू हा एक गरीब आणि गजरे विकणारा तरुण. एका झोपडपट्टीतील झोपडपट्टीत रस्त्यावरच राहत असतो. आजूबाजूला आडोसा करून राहणारी कुटुंबं आणि रात्रीचे प्रसंग सिद्धूला अस्वस्थ करत असतात. त्याच्या विवाहाचा विचार पुढे येताच तो अगोदर झोपडी मिळवण्याचा प्रयत्न करतो. झोपडीसाठी पैसे दिले जातात. त्याचा विवाह होतो आणि पुढे नाटक वेगळं वळण घेतं. प्रत्येक कलाकारानं भूमिका उत्तम साकारल्या आहेत.  

आज स्पर्धेची सांगता 
येथील केंद्रावर तब्बल चोवीस दिवस रंगलेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सांगता ‘एका गर्भाशयाची गोष्ट’ या नाटकाने आज (गुरूवारी) होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सातला नाटकाचा प्रयोग होईल. लक्ष्मण द्रविड यांचे लेखन व दिग्दर्शन असून यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीचे सादरीकरण असेल.

 दिग्दर्शक : हृषिकेश जोशी
 प्रकाशयोजना : रिया मुळे
 पार्श्वसंगीत : 
हृषिकेश जोशी, 
सिध्दी मिरजे, शेखर गुरव
 नेपथ्य : निलेश बोडके, 
प्रेम देवकुळे
 रंगभूषा : शशिकांत यादव
 वेशभूषा : 
गोपी वर्णे, मंजिरी गोडसे
  मंगेश कांबळे (सिध्दू), सिध्दी राजमाने (पिंकी), स्वराली कडू (जनी), नरेंद्र देसाई (रघु), अश्विनी पवार -मोकाशी (रमा), निलेश बोडके (लल्लन), प्रणाली नांगरे-पाटील (शाली), विनयकुमार शिंदे (म्हातारा), प्रेम देवकुळे, बयाजी करांडे, सुरेश पाटील (पुरूष), रोहन भोसले (जग्गू), मुकुंद जोशी (म्हातारा).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition