कोल्हापूर केंद्रावर ‘ऱ्हासपर्व’ची बाजी

कोल्हापूर केंद्रावर ‘ऱ्हासपर्व’ची बाजी

कोल्हापूर - राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या येथील केंद्रावर परिवर्तन कला फाऊंडेशनच्या ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाने बाजी मारली. इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतनच्या ‘दो बजनिए’ या नाटकाला दुसरा क्रमांक मिळाला. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज हा निकाल जाहीर झाला.

दरम्यान, आजरा येथील कृषिदूत कृषी विज्ञान संस्थेच्या ‘अक्कड-बक्कड’ या नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला. १५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात झालेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मनोहर धोत्रे, शरद गायकवाड आणि पुरुषोत्तम देशपांडे यांनी काम पाहिले. 

वैयक्तिक अनुक्रमे बक्षिसे अशी...
    दिग्दर्शन : किरणसिंह चहाण (ऱ्हासपर्व), यशोधन गडकरी (दो बजनिए).
    प्रकाश योजना ः कपिल मुळे (कॅलिगुला), अनिल सोनटक्के (दो बजनिए). 
    नेपथ्य : प्रतापराव डांगरे (दो बजनिए), केदार कुलकर्णी (अक्कड-बक्कड). 
    रंगभूषा : शंकर टोपले (महंत), सदानंद सूर्यवंशी (ऱ्हासपर्व)
    उत्कृष्ट अभिनय रौप्यपदके ः जितेंद्र देशपांडे (कॅलिगुला) व स्नेहल बुरसे (ऱ्हासपर्व) 

 अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः याज्ञसेनी घोरपडे (ती फुलराणी), वृषाली केळकर (अक्कड- बक्कड), कृत्तिका टेकाळे (अखेरचा सवाल), अंकिता कदम (नूर मोहम्मद साठे), शीतल रावत (एका गर्भाशयाची गोष्ट), डॉ. श्रद्धानंद ठाकूर (अक्कड-बक्कड), अनिरुद्ध भागवत (दो बजनिए), अरुण दळवी (वरचा मजला रिकामा), चंद्रशेखर फडणीस (महंत), नीलेश आवटी (अवध्य).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com