भरत जाधवची 'स्टेपनी' आता घराघरात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stepney marathi movie world television premier on star pravah picture

भरत जाधवची 'स्टेपनी' आता घराघरात..

bharat jadhav Stepney : नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता भरत जाधव कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य करत असतो. कधी तो नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर बोलतो तर कधी वारीच्या रंगात तल्लीन होऊन जातो. भरतने आजवर अनेज चित्रपट केले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने आपल्याला भरभरून हसवल आहे. असाच त्याचा 'स्टेपनी' हा चित्रपट आता आपल्याला घर बसल्या पाहता येणार आहे.

(stepney marathi movie world television premier on star pravah picture)

हेही वाचा: 'तमाशा लाईव्ह'ने लावलाय गाण्यांचा सपाटा, आता 'फड लागलाय' प्रदर्शित..

धुळ्यातील तुषार भटुलाल जयस्वाल दिग्दर्शित केलेला 'स्टेपनी' (Stepney) या सिनेमात भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहे. यासह विजू खोटे, आदिती भागवत, स्वाती चिटणीस, अमिता खोपकर, किशोर नांदलासकर अशा दिग्गज कलावंतांनी या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. तर तुषार जयस्वाल यांनीही या सिनेमात मध्यवर्ती भूमिका निभावली आहे. चित्रपटाची निर्मिती भटुलाल जयस्वाल यांनी केली आहे.

या चित्रपटातून भारत जाधव तुम्हाला खळखळून हसवायला येत आहेत, चित्रपटाच्या नावातच वेगळेपण असल्याने एक दमदार विनोदी कौटुंबिक नाट्य पाहायला मिळणार आहे. तेव्हा स्टेपनी म्हणजे काय, कोणती ‘स्टेपनी’, कोणाची 'स्टेपनी' अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज प्रेक्षकांना मिळणार आहेत.स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर (आज) रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

Web Title: Stepney Marathi Movie World Television Premiere On Star Pravah Picture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Movies
go to top