Phulrani: सुबोध भावेची "फुलराणी" भारताआधी परदेशात फुलली.. पहिलाच शो हाऊसफुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 phulrani movie, phulrani movie news, priyadarshani indalkar

Phulrani: सुबोध भावेची "फुलराणी" भारताआधी परदेशात फुलली.. पहिलाच शो हाऊसफुल्ल

Phulrani Movie News: सुबोध भावे, प्रियदर्शनी इंदलकर यांच्या 'फुलराणी' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. फुलराणी लवकरच महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. पण रिलीजआधीच फुलराणीची हवा सगळीकडे झालीय.

ती फुलराणी नाटकावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमाची सगळे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भक्ती बर्वे यांनी नाटकात प्रमुख भूमिका साकारली होती. आता फुलराणीचा डंका परदेशात गाजतोय.

(Subodh Bhave and priyadarshani indalkar "Phulrani" movie First show Housefull in San Francisco)

फुलराणी सिनेमा परदेशात सुद्धा रिलीज होणार आहे. फक्त एका दिवसात सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियातील 'फुलराणी' चा पहिलाच शो हाऊसफुल झालाय!! येत्या आठवड्यापासून न्यू जर्सी, बॉस्टन आणि शिकागोतही बुकिंग ओपन होतंय..

अशाप्रकारे फुलराणी सिनेमाचा परदेशातला शो हाउसफुल्ल झालाय. मराठी प्रेक्षकांसाठी निश्चितच हि अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

परदेशात फुलराणी फुलली आता महाराष्ट्रात फुलराणीला कसा प्रतिसाद मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 'ती फुलराणी' हे मूळ नाटक पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.

या नाटकात भक्ती बर्वे यांनी मंजुळाची भूमिका साकारली. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष, हेमांगी कवी यांनी मंजुळाची भूमिका साकारली. आता सिनेमाच्या माध्यमातून प्रियदर्शनी इंदलकर मंजुळाची भूमिका साकारणार आहे.

मागील वर्षभरापासून फुलराणी सिनेमाची प्रचंड हवा होती. बरं ही फुलराणी आहे तरी कोण? याचं आणखी वेगळं कुतूहल सर्वांच्या मनात होतं.

अखेर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर फुलराणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्चला सिनेमागृहात 'फुलराणी' भेटायला येणार आहे. १३ फेब्रुवारीला 'फुलराणी' सिनेमाची पहिली झलक सगळ्यांना पाहायला मिळाली.

प्रियदर्शनी इंदलकरनं याआधी 'सोयरिक','भाऊबळी' सिनेमात काम केलं आहे. 'हास्यजत्रे'च्या माध्यमातून तर ती महाराष्ट्रातील घराघरात ओळखली जातेच. आता 'फुलराणी' नावानं तिला अख्खा महाराष्ट्र काही दिवसांत ओळखेल.

विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

टॅग्स :Marathi Movies