मुह से सुपारी निकालकर बात कर बाबा... Hera Pheri 3 मध्ये Sanjay Dutt साकारणार हि धम्माल भूमिका

संजय दत्त हेरा फेरी ३ मध्ये एक धम्माल भूमिका साकारणार आहेत
hera pheri 3, sanjay dutt, akshay kumar, sunil shetty, paresh rawal
hera pheri 3, sanjay dutt, akshay kumar, sunil shetty, paresh rawalSAKAL

Hera Pheri 3 News: अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हेरा फेरी ३ सिनेमाचं शूटिंग सुरु झालंय. सध्या मुंबईतील अंधेरीत एम्पायर स्टुडिओमध्ये हेरा फेरी ३ (Hera Pheri 3) च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

हेरा फेरी ३ बद्दल मोठी अपडेट काही दिवसांपूर्वी समोर आली ती म्हणजे यंदाच्या भागात संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) सहभागी असणार आहेत.

(Sanjay Dutt's role in Hera Pheri 3)

hera pheri 3, sanjay dutt, akshay kumar, sunil shetty, paresh rawal
"मुंबईत खूप गर्मी आहे तर.." रील स्टार Karan Sonawane थेट लंडनहून राज ठाकरेंच्या भेटीला

आता संजय दत्त यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे संजय दत्त हेरा फेरी ३ मध्ये एक धम्माल भूमिका साकारणार आहेत. हि भूमिका कोणती हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. हि भूमिका म्हणजे तोतला गॅंग.

तोतला गॅंग तुम्हाला आठवत असेल. हेरा फेरी २ मध्ये असलेल्या या गॅंगने बोबडं बोलल्यामुळे सर्वांची हसून हसून पुरेवाट लावली.

hera pheri 3, sanjay dutt, akshay kumar, sunil shetty, paresh rawal
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे Bhagyashree Milind

आता याच तोतला गॅंगमध्ये संजय दत्त सहभागी होणार आहे. तोतला गॅंग मध्ये जो रवी किशन असतो त्याच्या मोठया भावाच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे.

त्यामुळे संजय दत्त तोतला गॅंगमध्ये सहभागी होऊन बाबूभैय्या, राजू आणि श्यामला जेरीस आणणार यात शंका नाही. संजय दत्त यांनी स्वतः एक व्हिडिओ शेयर करून ते हेरा फेरी ३ मध्ये आहेत यावर शिक्कामोर्तब केलाय.

संजय दत्त हेरा फेरी ३ मध्ये सहभागी होऊन खूप आनंदी आहेत. संजूबाबाने नुकतंच त्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

संजय दत्त म्हणाला, “हेरा फेरी ही एक अप्रतिम फ्रँचायझी आहे आणि त्याचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. फिरोज आणि माझे नातेही खूप जुने आहे. अक्षय कुमार, संजय दत्त आणि परेश रावल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप भन्नाट आहे.

hera pheri 3, sanjay dutt, akshay kumar, sunil shetty, paresh rawal
हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान Amitabh Bachchan यांना गंभीर दुखापत, तत्काळ मुंबईत रवाना

काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारने मुंबईत सुनील शेट्टी, परेश रावल आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांची भेट घेऊन हेरा फेरी ३ विषयी चर्चा केली.

अखेर आज हेरा फेरी ३ सिनेमाला शूटिंग झाली असून पुढच्या वर्षी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com