esakal | सुबोध-तेजस्विनीची जोडी पुन्हा एकत्र

बोलून बातमी शोधा

Subodh Bhave, Tejaswini Pandit
सुबोध-तेजस्विनीची जोडी पुन्हा एकत्र
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी तब्बल एका दशकानंतर रुपेरी पडद्यावर रसिकांना एकत्रित दिसणार आहे. ‘वर्तमान’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पाटील म्हणाले की, "सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार, खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोण हा वेगळाच असतो. अशा ज्वलंत विषयावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे."

या चित्रपटात सुबोध भावे, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते अशा अनेक कलाकारांनी अभिनय केला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांनी केले असून संगीत हर्षित अभिराज यांचे आहे. तर चित्रपट लेखन संजय पवार यांनी केले आहे

हेही वाचा : 'सत्य खाडकन् थोडाबीत मारल्यासारखं समोर आलं'; फुलवा खामकर भावूक

हा चित्रपट मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असून महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात हा चित्रपट एकाच वेळी सर्वत्र प्रदर्शित होणार अशी माहिती चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, "मराठीतील मल्टीस्टारर व दर्जात्मक कथानक असलेला चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेईल यात मात्र शंका नाही."