सुबोध भावे चक्क शॉर्ट फिल्म मध्ये, साकारणार 'धर्माभिमानी हिंदूची' भूमिका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

subodh bhave new short film antahkaran poster release

सुबोध भावे चक्क शॉर्ट फिल्म मध्ये, साकारणार 'धर्माभिमानी हिंदूची' भूमिका..

subodh bhave : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चरित्र भूमिका साकारणारा असा हा महत्वाचा अभिनेता आहे. आज मराठीमध्ये सुपरस्टार अशी त्याची ख्याती होत आहे. सुबोध नाटक, मालिका, चित्रपट सारवहक माध्यमात शिताफीने काम करतो. पण यंदा त्याने चक्क शॉर्ट फिल्म हे माध्यम निवडलं आहे. लवकरच त्यांची 'अंतःकरण' ही शॉर्टफिल्म येत आहे. (subodh bhave new short film antahkaran poster release)

सुबोधची 'अंत:करण' ही शाॅर्टफिल्म याच महिन्याच युट्यूबवर रिलीज होणार आहे. त्याबद्दल  त्यानं सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सुबोधनं लिहिलं आहे, 'एका धर्माभिमानी हिंदूची ही कथा आहे. तो दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या सहकाऱ्यांमध्ये अडकला असून दोघंही त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.' ही शाॅर्टफिल्म २७ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता रिलीज होणार आहे.

ही शॉर्ट फिल्म 'पाॅकेट फिल्म्स'या युट्यूब चॅनेलवर पाहता येईल. या फिल्ममध्ये सुबोधबरोबर अभिनेता सचित पाटील आणि रवी काळे आहेत. अभिषेक गुणाजी आणि संदीप बाणकेश्वर यांनी फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक हा मिलिंद गुणाजी यांचा मुलगा आहे. या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून सुबोधला एका नवीन भूमिकेत पाहता येणार आहे.

Web Title: Subodh Bhave New Short Film Antahkaran Poster Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Subodh Bhave