esakal | सुशांत आत्महत्या प्रकरणात बॉलीवूडच्या तीनही खानवर सुब्रमण्यम स्वामींचा निशाणा, म्हणाले 'यांच्या दुबईच्या प्रॉर्पर्टींची चौकशी करा'
sakal

बोलून बातमी शोधा

subramanyam swami

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यांचे चाहते सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आता बीजेपी नेते आणि संसद सुब्रमण्यम स्वामींनी सुशांतच्या आत्महत्येवर सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणात बॉलीवूडच्या तीनही खानवर सुब्रमण्यम स्वामींचा निशाणा, म्हणाले 'यांच्या दुबईच्या प्रॉर्पर्टींची चौकशी करा'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यांचे चाहते सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आता बीजेपी नेते आणि संसद सुब्रमण्यम स्वामींनी सुशांतच्या आत्महत्येवर सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामींनी गुरुवारी ट्विट करुन सांगितलं होतं की, सुशांत प्रकरणात सीबीआयच्या तपासासाठी आवश्यक कागदपत्रांच्या तयारीसाठी एका वकिल नेमला आहे. आता त्यांनी या प्रकरणात बॉलीवूडचे तीन खान सलमान, शाहरुख आणि आमीर खान यांच्या गप्प बसण्यावर प्रश्न केला आहे. 

हे ही वाचा: कंगना रनौतने सुरु केली आगामी 'धाकड' सिनेमाची तयारी

सुब्रमण्यम स्वामीने ट्विट करुन लिहिलं की, 'बॉलीवूडचे तीन ताकदवर सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान आत्तापर्यंत सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येवर गप्प का आहेत?' स्वामी यांच्या या ट्विटवर सुशांतचे चाहते आता खुलेआम बोलत आहेत.

यानंतर पुन्हा आणखी एका  ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे. 'भारतातील या तीन खान द्वारे खासकरुन दुबईमध्ये बनवलेल्या प्रॉपर्टीची पडताळणी व्हायला हवी. त्यांना तिथे कोणी बंगले आणि प्रॉपर्टी गिफ्ट केली आणि त्यांनी हे सगळं कसं खरेदी केलं. या गटबाजीची तपासणी अन्वेशण अंमलबजावणी संचालनानालय एसआयटी, आयकर विभाग आणि सीबीआयने केली पाहिजे. हे लोक कायद्यापेक्षा मोठे आहेत का?' 

याआधी देखील स्वामी यांनी ट्विटरवर वकिल ईशकरण सिंह भंडारीसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मोठा व्हिडिओ शेअर केला होता. शुक्रवारी स्वामी यांनी ट्विटरवर लिहिलं, 'सध्या ईशकरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की या प्रकरणात आर्टिकल २१ सोबत आईपीसी कलम ३०६, आणि ३०८ लागू होत आहेत का? का मग पोलिसांनी दिलेला निर्णय स्विकारावा ज्यात सुशांतने आत्महत्या केली असं म्हटलं आहे?'

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या या विधानांवर आता सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे आमीर, सलमान आणि शाहरुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.   

subramanian swamy questions three khans of bollywood for being silent on sushant singh rajput suicide  

loading image