esakal | कंगना रनौतने सुरु केली आगामी 'धाकड' सिनेमाची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

kangna

अनलॉकनंतर अनेक सेलिब्रिटींनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे तर काही जण काम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने देखील पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

कंगना रनौतने सुरु केली आगामी 'धाकड' सिनेमाची तयारी

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- अनलॉकनंतर अनेक सेलिब्रिटींनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे तर काही जण काम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने देखील पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. कंगनाने तिच्या आगामी 'धाकड' या सिनेमाच्या स्क्रीप्ट वाचनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.  कगंनाने तिच्या सोशल साईटवरुन याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा: चार महिन्यांनतर शूटसाठी बाहेर पडला अर्जुन कपूर, लोकेशनवरचे फोटो केले शेअर..

अभिनेत्री कंगना रनौतच्या टीमने सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कंगना  दिग्दर्शक रजनीश घई, लेखक रितेश शाह आणि निर्माते सोहेल मकलई यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताना दिसत आहे. कंगनाच्या टीमने याचा एक स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलंय, 'हे एक वर्च्युअल स्क्रीप्ट वाचनचं सेशन आहे. कंगना रनौत, रजनीश घई, रितेश घई आणि सोहेल मकलई यांनी धाकडची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.'

ही पोस्ट करताना त्यांनी हॅशटॅग लॉकडाऊन स्क्रीप्ट सेशन असं देखील लिहिलं आहे. 'धाकड' हा एक मोठा ऍक्शन सिनेमा आहे. कंगना यात मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमाबाबत बोलताना एकदा कंगनाने सांगितलं होतं की हा सिनेमा भारतीय सिनेमातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. हा एक स्त्रीप्रधान सिनेमा आहे. 

'धाकड' हा सिनेमा या वर्षी दिवाळीत रिलीज होणार होता. त्यासाठी गेल्या वर्षीच सगळी तयारी सुरु झाली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. यात कंगना तिच्या दोन्ही हातांमध्ये स्निपर्स घेऊन उभी असल्याचं दिसतंय. यामध्ये ती पाठमोरी उभी आहे आणि तिचा अर्धा चेहरा दिसून येत आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात याचा टिझर देखील आला होता. टिझरच्या शेवटी ती भयानेक पद्धतीने तिच्या चेह-यावरील रक्त देखील चाटताना दिसत आहे. या सिनेमाची आता स्क्रीप्ट वाचनाची प्रक्रिया सुरु आहे तेव्हा चाहत्यांना हा सिनेमा पडद्यावर पाहण्यासाठी अजुन बरीच वाट पाहावी लागणार आहे.     

kangana ranaut started virtual reading session for upcoming action film dhaakad  

loading image
go to top