Suchitra Krishnamoorthy Allegations Preity Zinta
Suchitra Krishnamoorthy Allegations Preity Zinta esakal

Suchitra Krishmamoorthi : 'प्रीती झिंटामुळे झाला माझा घटस्फोट'! प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

सुचित्रानं बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रीतिच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Suchitra Krishnamoorthi blamed Preity Zinta for her divorce : प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती आणि प्रख्यात दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या घटस्फोटाला १५ वर्षे होऊन गेलीत. मात्र तो कुणामुळे झाला याविषयी सुचित्रानं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं थेट प्रीती झिंटाचे नाव त्यात घेतले आहे.

सुचित्रानं बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रीतिच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. २००० साली सुचित्रानं प्रीतिवर तिचं घर तोडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी प्रीतिनं म्हटलं होतं की, मी सगळ्यात आघाडीची अभिनेत्री आहे. आणि तू तर कामही करत नाही. साधी गृहिणी आहेस. तेव्हा तू माझ्याशी असं बोलू नकोस. एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घे. असा सल्ला प्रीतिनं सुचित्राला दिला होता. सुचित्रानं आता प्रीतिच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यासाठी प्रीति कुणीच नाही....

असं म्हटलं जातं की, प्रीतीनं तिच्या त्या वक्तव्यामुळे सुचित्राची माफीही मागितली होती. पण तोपर्यत खूप उशीरही झाला होता. प्रीतिनं सुचित्राला फोन करुन माफी मागितल्याचे बोलले जाते. तसेच तिनं सुचित्राला तिच्या पहिल्या चित्रपटाच्या जानेमनच्या स्क्रिनिंगला बोलावले होते, मात्र ती काही गेली नाही. एका मुलाखतीमध्ये सुचित्रानं सांगितलं होतं की, मी अजूनपर्यत तिला माफ केलेलं नाही. ती माझ्यासाठी कुणीही नाही.

Suchitra Krishnamoorthy Allegations Preity Zinta
Kanal Kannan Arrested : प्रसिद्ध स्टंट मास्टर, अभिनेते कनाल यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या! काय आहे कारण?

मला तिला माफ करण्याची काही एक गरजही नाही. कारण आता माझ्यालेखी तिचे काहीही महत्व नाही. मी खूप आनंदी आहे. सध्या जे काही माझ्या आयुष्यात सुरु आहे त्यामुळे मी गतकाळाविषयी बोलू इच्छित नाही. पण ज्या माणसांशी कधीच संवाद साधायचा नाही असे ठरवले तो नियम मात्र काही केल्या मोडणार नाही. अशी भूमिका सुचित्रानं बोलून दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com