बॉलिवू़डमधली नवी घराणेशाही! शाहरुखची मुलगी सुहानाही आता झळकणार

टीम ईसकाळ
Thursday, 13 June 2019

सुहानाची एक इन्स्टा पोस्ट व्हायरल झालेली दिसतीये. त्यात ती एका कारच्या फ्रंट सिटवर बसलेली दिसतीये. हा तिच्या आगामी शॉर्टफिल्ममधील फोटो आहे.

किंग खान शाहरूखप्रमाणेच त्याची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. पण आता ती शाहरूखचा अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवत एका शॉर्टफिल्ममध्ये पदार्पण करत आहे. बॉलीवूड स्टर्सची मुलं सध्य जोरदार इंडस्ट्रीमध्ये येत आहेत. पण सुहाना कधी पदार्पण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर तिने चित्रपटाचा मार्ग न निवडता शॉर्टफिल्ममार्फत पदार्पण करायचे ठरवले आहे.

सुहानाची एक इन्स्टा पोस्ट व्हायरल झालेली दिसतीये. त्यात ती एका कारच्या फ्रंट सिटवर बसलेली दिसतीये. हा तिच्या आगामी शॉर्टफिल्ममधील फोटो आहे. या शॉर्टफिल्मची निर्मिती तिचाच मित्र करत असून सुहाना यात मुख्य भूमिकेत दिसेल. हा फोटो तिच्या एका फॅनक्लब पेजवरून शेअर करण्यात आला असून ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो आहे.

सुहाना सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत असून अभिनयाचे धडे ही घेत आहे. सुहानाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही असं, शाहरुखने सांगितलं होतं. मात्र सुहानाने एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून कलाविश्वामध्ये पदार्पण केल्याचं दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suhana Khan daughter of Shahrukh Khan plays main role in Shortfilm