esakal | भाऊ आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची पहिली पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan, Abram, Suhana

भाऊ आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची पहिली पोस्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खानची Shah Rukh Khan पत्नी गौरीचा Gauri Khan आज वाढदिवस आहे. या निमित्ताने मुलगी सुहानाने Suhana Khan तिच्या आई-वडिलांचा म्हणजेच शाहरुख आणि गौरीचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा खास फोटो शेअर करत सुहानाने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्सचा वर्षाव केला असून कमेंट्समध्ये इंडस्ट्रीतील कलाकारांनीही गौरीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माँ' असं कॅप्शन सुहानाने या फोटोला दिलं आहे. ड्रग्ज प्रकरणी भाऊ आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची ही पहिलीच पोस्ट आहे.

क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २ ऑक्टोबरपासून आर्यन एनसीबी कोठडीत आहे. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शाहरुख-गौरीला पाठिंबा देत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. काहींनी 'मन्नत' बंगल्यावर जाऊन या दोघांची भेट घेतली तर काहींनी फोन करून शाहरुखची विचारपूस केली. इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी सोशल मीडियावर आर्यनसाठी पोस्ट लिहिली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे हृतिक रोशन. आर्यनसाठी लिहिलेल्या पोस्टला सुहानाने लाइक केलं होतं.

हेही वाचा: आर्यन खानला मिळणार जामीन?

कोरिओग्राफर फराह खाननेही शाहरुख-गौरीचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'एका आईच्या हिंमतीची तुलना कोणासोबत केली जाऊ शकत नाही. आईवडिलांच्या प्रार्थनेत इतकी ताकद असते की ते पर्वतांनाही हलवू शकतात आणि समुद्राचंही विभाजन करू शकतात. गेल्या आठवड्याभरापासून जिला मी खूप जवळून पाहिलं, ती गौरी सर्वांत धीट आई आणि महिला आहे', अशी पोस्ट फराहने लिहिली आहे.

loading image
go to top