आता सुकेशनं घेतलं सारा, जान्हवी आणि भूमीचंही नाव; 215 कोटी उकळल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता सुकेशनं घेतलं सारा, जान्हवी आणि भूमीचंही नाव; 215 कोटी उकळल्याचा आरोप

आता सुकेशनं घेतलं सारा, जान्हवी आणि भूमीचंही नाव; 215 कोटी उकळल्याचा आरोप

मुंबई: सध्या ईडीकडून सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याची चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये सुकेशने जॅकलीन फर्नांडीस आणि नोरा फतेह (Jacqueline Fernandez and Nora Fatehi) यांच्यासोबत आणखी तीन अभिनेत्रींची नावे घेतली आहेत. (Enforcement Directorate - ED)

हेही वाचा: नवाब मलिकांची माहिती मी दिली, राज्यपालांना भेटल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

या तीन अभिनेत्रींमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर यांच्या नावांचाच समावेश आहे. सुकेशने यांना महागडे गिफ्ट्स देण्यासाठी खंडणीतला पैसा वापरल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

32 वर्षीय सुकेश चंद्रशेखरने आदिती सिंहकडून 215 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. आदिती सिंह सध्या रॅनबॅक्सीच्या मालकाची पत्नी आहे. सध्या सुकेश दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. अधिकारी असल्याचं भासवत त्याने तिच्या पतीला तुरुंगातून बाहेर येण्यास मदत करण्याच्या बहाण्याने अदिती सिंहकडून त्याने 215 कोटी रुपये उकळले आहेत, अशी तक्रार आहे.

हेही वाचा: ब्रिटनचा रशियाला दणका, ५ बँकांवर निर्बंध; ३ अब्जाधीशांची संपत्ती जप्त

सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली बरीच महागडी जनावरं

सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली आहे.

सुकेशने मे 2021 मध्ये सारा अली खानचं नाव घेऊन तिला टार्गेट केलं होतं. त्यानं स्वत: सूरज रेड्डी नावाचा अभिनेता असल्याचं भासवत 21 मे 2021 रोजी तिला मेसेज केला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर त्यांचं संभाषण सुरूच राहिलं. आणि अखेरीस, सुकेशने साराला सांगितलं की तो तिला त्यांच्या मैत्रीखातर एक कार भेट देऊ इच्छितो.

Web Title: Sukesh Chandrashekhar Jacqueline Fernandez Ed Also Targeted Sara Ali Khan Janhvi Kapoor Bhumi Pednekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top