Urfi Chahatt Argument: 'बायको, आई होण्याची लायकी नाही...' उर्फीवर चाहत खन्नाचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chahat Khanna spicy reaction on urfi javed

Urfi Chahatt Argument: 'बायको, आई होण्याची लायकी नाही...' उर्फीवर चाहत खन्नाचा पलटवार

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आणि चाहत खन्ना यांच्यात वाद सुरू असून त्यांचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचला आहे. अभिनेत्री चाहत खन्नाचं नाव फसवेगिरी करणाऱ्या सुकेश चंद्रकुमारच्या मनी लाँड्रिंग केसमध्ये पुढे येताच उर्फीने तिच्यावर भाष्य केलं. उर्फी चाहत खन्नाला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र चाहत खन्नाही याबाबतीत मागे नाही, तिनेही एक तिखट प्रतिक्रियेची पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकली आहे.

चाहत खन्नाने का केला उर्फीवर पलटवार?

चाहतने तुरूंगात सुकेशची भेट घेतली आणि त्याच्याकडून महागडे गिफ्ट्स घेतले होते असं सांगितल्या जातंय. ही गोष्ट पुढे येताच उर्फीने लगेच चाहतवर कमेंट केली होती. मात्र चाहतने रागात उर्फीला दीदी म्हटलं आणि मग काय या दोघींत कॅटफाईट सुरू झाली. चाहतच्या कमेंटला प्रतीउत्तर देत उर्फीनेही तिला आंटी म्हटलं. उर्फीने चाहतला गोल्ड डीगरही म्हटले होते.

चाहत खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. "खरं काय ते माहिती नसताना पब्लिसीटीसाठी मधे पडणे हा मुर्खपणा आहे. ब्रेनलेस लोकांशी काय वाद करायचा. डोकं असतं तर सेमी न्यूड स्पॉटींग केली नसती. स्वत: कोणाची आई बायको बनण्याची लायकी नाही म्हणून दुसऱ्यांना आंटी म्हणण्यातच खुश असणाऱ्यांना अल्लाह थोडी अक्कल द्या. अशा तिखट शब्दांत चाहतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा: Urfi Javed : तुला माझं यश बघवत नाही, उर्फी जावेद चाहत खन्नावर भडकली

ही पोस्ट उर्फीसाठी असल्याचे स्पष्ट दिसून येते. या दोघींच्या एकमेकींवरच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असतात. या पोस्टमध्ये चाहतने हॅशटॅक जावेदही मेंशन केलाय.

Web Title: Sukesh Chandrashekhar Money Laundering Case Chahatt Khanna Hits Back To Urfi Javed By Her Insta Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..