Urfi Javed : तुला माझं यश बघवत नाही, उर्फी जावेद चाहत खन्नावर भडकली

तुला माझं यश बघवत नाही....
Urfi Javed And Chahatt Khanna
Urfi Javed And Chahatt Khannaesakal

Urfi Javed And Chahatt Khanna News : उर्फी जावेद आणि चाहत खन्ना यांच्यात सोशल मीडियावर वाक् युद्ध रंगले. 'बडे अच्छे लगते है' स्टार प्रथम उर्फीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन तिच्या युनिक ड्रेसिंग सेन्सवर बोट ठेवते. ती तिच्या फॅशन सेन्सला असभ्य म्हणते आणि म्हणते की ती तरुणाईला चुकीचे संदेश पाठवत असल्याचा चाहत उर्फी जावेदवर (Urfi Javed) आरोप करते.

याच रुपांतर क्षुल्लक भांडणात होते, जेथे उर्फी चाहत खन्नाच्या (Chahatt Khanna) वैयक्तिक आयुष्यावर उपहासात्मक बोलते. ती तिच्या दोन घटस्फोटांची टिंगल उडवते, तिला अँटी म्हणते. हे तू-तू मैं मै चाहत उर्फीला ब्लाॅक केल्यावर थांबते. (Urfi Javed Slams Chahatt Khanna For Calling Her Fashion Cheap Show)

Urfi Javed And Chahatt Khanna
'हर हर शंभू' नंतर कृष्ण भक्तीत फरमानी नाज तल्लन, व्हिडिओ होतोय व्हायरल

नेमक काय घडल?

चाहत उर्फीचा अलीकडचा फोटो शेअर करुन म्हणते, हे कोणी परिधान केले? आणि तेही रस्त्यांवर? मला म्हणायच की कोणीही त्याच्या कपड्यांवरुन आणि मीडिया त्याला सेलिब्रिटी बनवते का? भारतीय मीडिया इतका असुरक्षित झाला आहे का? प्रसिद्धी आणि मीडिया विकत घेणे सोपे झाले आहे. (Entertainment News)

हा चिप शो तुम्ही आपल्या पिढीकडे ढकलत आहात. एखादा काही करेल म्हणजे नग्नही होईल आणि तुम्ही तसेच चालू ठेवाल? थोड्या अक्कलसाठी देवच तुम्हाला आशीर्वाद देवो.

Urfi Javed And Chahatt Khanna
आमिरच्या 'लालसिंग चड्ढा'वर अन्नू कपूरची अजब प्रतिक्रिया ! तो कोण आहे?

यामुळे संतापलेल्या उर्फी जावेदने चाहत खन्नाची स्टोरी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रतिक्रिया दिली, मी तरी फाॅओवर्स विकत घेत नाही. जर तू घरी गृहपाठ केला असेल, तर एक मुलाखत होती. मी मुलाखतीसाठी ड्रेस परिधान केले होते जे तुझ काम नाही. तुला माझं यश बघवत नाही.

या पृथ्वीतलावर जो काही करत असेल त्याच्याशी तुझ काही देणं-घेण नाही अस उर्फीने चाहतला सुनावले. ही स्टोरी तू रणवीर सिंगसाठी का अपलोड नाही केली? तुझ्या दोन घटस्फोटावरुन मी तुला पारखणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com