Jacqueline-Sukesh: 'मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईल', सुकेशचं जॅकलिनसाठी होळीनिमित्त पुन्हा प्रेमपत्र.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez

Jacqueline-Sukesh: 'मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईल', सुकेशचं जॅकलिनसाठी होळीनिमित्त पुन्हा प्रेमपत्र..

महाठग सुकेश चंद्रशेखर सतत मीडियाच्या चर्चेत असतो. सुकेश तिहार तुरुंगात आहे, त्याच्यावर 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो तुरुगांत असला तरी तो चर्चेत असतोच.

आता सुकेशने लिहिलेले एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. होळीच्या सणानिमित्त त्यांने हे पत्र बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची कथीत गर्लफ्रेंड जॅकलिन फर्नांडिससाठी लिहिले आहे. या पत्रात सुकेशने अभिनेत्रीला होळीच्या शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात त्याने जॅकलिनला एक चांगली व्यक्ती म्हणून त्यानं लिहिलयं आहे. आहे. सुकेशने जॅकलिनला तिच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरण्याचे आश्वासन दिलं आहे.

होळीच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात सुकेशने म्हटले आहे की, तू सर्वात अद्भुत, सुंदर व्यक्ती आहेस, मी माझ्या लाडक्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो.

त्यांनी पुढे लिहिले की, रंगांच्या या सणाच्या निमित्ताने मी तुला वचन देतो की तुझ्या आयुष्यातले जे रंग फिके पडले आहेत किंवा गायब झाले आहेत, ते मी तुला 100 वेळा परत करीन.

Sukesh Chandrashekhar Wrote New Letter For Jacqueline Fernandez

Sukesh Chandrashekhar Wrote New Letter For Jacqueline Fernandez

मी माझे वचन नक्कीच पाळेन ती माझी जबाबदारी आहे. सुकेशने पुढे लिहिले की, तुला माहित आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. नेहमी हसत राहा आणि त्याने जॅकलीनला लव्ह यू प्रिसेंस असेही म्हटले आहे.

इतकच नाही तर त्याने या पत्रात त्याचे कुटुंबीय, समर्थक, मित्र आणि अगदी त्याचा तिरस्कार करणाऱ्यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

सुकेश म्हणतो की, तो अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तो सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. त्याच वेळी, या प्रकरणात, ईडीने सागंतिले आहे की सुकेशने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. तो चार वेळा जॅकलीनला चेन्नईत भेटला आहे आणि चार्टर्ड प्लेनवर 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. तुरुंगात गेल्यानंतरही सुकेश बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवत असे.