
सुमित महेश्वरीने ऑन रेकॉर्ड खुलासा केला आहे की पवित्रा पुनियाने त्याच्यासोबत लग्न केलं आहे. त्याने सांगितलं की पवित्राने त्याला चार वेळा धोका दिला.
मुंबई- 'बिग बॉस १४'च्या घरातून या आठवड्यात पवित्रा पुनिया घराबाहेर पडली. घरातून बाहेर आल्यानंतर पवित्रा पुनियाच्या बाबतीत धक्कादायक खुलासा केला आहे. एक हॉटेल चालवणा-या सुमित महेश्वरीने ऑन रेकॉर्ड खुलासा केला आहे की पवित्रा पुनियाने त्याच्यासोबत लग्न केलं आहे. त्याने सांगितलं की पवित्राने त्याला चार वेळा धोका दिला. सुमितने सांगितलं की तो आता पवित्रासोबत लग्नबंधनात आहे. दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही.
हे ही वाचा: शाहरुख खानचा 'पठान'मधील लूक आला समोर, यशराज स्टुडिओ बाहेर दिसला
शाहरुख पवित्रा पुनियाने बिग बॉसच्या घरात असताना कधीच ती विवाहीत असल्याचं मान्य केलं नाही. मात्र बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये तिने कविता कौशिक समोर मान्य केलं होतं की तिचा साखरपुडा झाला होता. सुमित महेश्वरीने युट्युबर राहुल भोजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की पवित्राने त्याला चार वेळी दगा दिला आहे. पवित्राने याआधी पारस छाब्रा आणि प्रतीक सेहजपालसोबत असलेल्या तिच्या नात्याविषयी बोलली होती.
सुमितने सांगितलं की पवित्राने त्याला त्यांचं लग्न एका सिक्रेट सारखं लपवण्यासाठी सांगितलं होतं. सुमितने सांगितलं की पवित्राच्या अशा वागण्याने त्याच्या कुटुंबाला खूप वाईट वाटलं आहे. त्याने असा आरोप देखील केला आहे की तिने एजाजसोबत रिलेशन बनवलं आहे. सुमित म्हणाला की पवित्रा आणि तो आता या निर्णयावर येऊन पोहोचले आहेत की आता रिलेशनशिपसोबत राहु शकत नाही. ''पवित्राला आत्तापर्यंत अनेकदा माफ केलं गेलं मात्र आता नाही. बिग बॉसमध्ये पवित्राने एजाजसोबत फ्लर्ट केलं. त्याने सांगितलं की पवित्रा घटस्फोटानंतर एजाजसोबत डेंटिग करु शकते.''
sumit maheshwari claimed to be married to pavitra punia says she cheated him four times