
लॉकडाउनमुळे अनेक मालिकांच्या शूटिंग बंद पडल्या. त्यात 'द कपिल शर्मा शो' The Kapil Sharma Show या कॉमेडी शोनेही प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा शो बंद झाल्यापासून बेरोजगार असलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीची Sumona Chakravarti सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये सुमानाने तिला २०११ पासून 'एंडोमेट्रिओसिस'चा Endometriosis त्रास असल्याचाही खुलासा केला. (Sumona Chakravarti says she is unemployed reveals she has been battling endometriosis)
सुमोनाने वर्कआऊटचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'बऱ्याच दिवसांनी मी घरी व्यवस्थित वर्कआऊट करू शकले. मी बेरोजगार असले तरी माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं पोट भरू शकतेय. सध्याच्या घडीला एवढं करू शकणंही खूप केल्यासारखं आहे. कधी कधी माझ्या मनात अपराधीपणाची भावना येते. विशेषत: तेव्हा जेव्हा भावनांवर माझं नियंत्रण राहत नाही. मी हे आधी कधीच सांगितलं नाही. पण २०११ पासून मी एंडोमेट्रिओसिस या आजाराशी झुंज देतेय. गेल्या अनेक वर्षांपासून मी या आजाराच्या चौथ्या स्टेजला आहे. खाण्यापिण्याचे पथ्य, व्यायाम आणि तणावमुक्त आयुष्य याची मला फार गरज आहे. हा लॉकडाउन भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी फार कठीण आहे.'
जे दिसतं ते सोनं नसतं, असं सांगत सुमोनाने तिच्या आयुष्याविषयी सांगितलं. 'आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी संघर्ष करतोच आहोत. प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष आहे. दु:ख, ताण, तणाव, द्वेष यांनी आपण घेरलेलो आहोत. प्रेम, दयेच्या भावनांनी आपण या वादळातून बाहेर येऊ शकतो. या पोस्टमुळे कोणाला प्रेरणा किंवा आशेचं किरण मिळालं असेल तरी माझा उद्देश सार्थक झाला', असं तिने पुढे लिहिलं.
सुमोनाच्या या पोस्ट सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. सुमोनाने 'कस्तुरी', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है', 'जमाई राजा' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तिने 'किक', 'बर्फी' आणि 'फिर से' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.