Suniel Shetty Post : 'माझ्या दृष्टीनं रोहित शर्मा हाच...' बॉलीवूडचा अण्णा काय बोलून गेला?

बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील कालच्या सामन्यासाठी उपस्थिती लावली होती.
Suniel Shetty
Suniel Shettyesakal

World Cup 2023 Suniel Shetty Post : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सामन्यात भारतानं विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले असून त्यांना आता विश्वकप विजयासाठी असंख्य चाहते आणि बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. Suniel Shetty post on World Cup 2023 Rohit Sharma

बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील कालच्या सामन्यासाठी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये जॉन अब्राहम, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, माधुरी दीक्षित, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूत तसेच थलायवा सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील मॅच पाहण्याचा आनंद लुटला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहूलचे सासरे सुनील शेट्टी यांच्या एक्सवरील पोस्टची चर्चा रंगली आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत भारतीय खेळाडुंची स्तुती केली असून कर्णधार रोहित शर्माविषयी लिहिलेल्या पोस्टवरुन चर्चेला सुरुवात झाली आहे.

सुनील शेट्टी यांनी केलं कौतुक....

अभिनेता सुनील शेट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडेलवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यांनी एक्सवर दिलेल्या त्या प्रतिक्रियेनं हजारो चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात की, विराट कोहली तर रेकॉर्ड तोडतच राहिल, श्रेयस अय्यर बातमीचा विषय होईलच पण माझा कॅप्टन रोहित शर्मा हा द मॅन ऑफ द मोमेंट आहे. त्यानं त्याच्या खेळीतून खूप काही सिद्ध केले आहे.

रोहितनं त्याच्या खेळीतून संघामध्ये एक वेगळे स्पिरिट निर्माण केले आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. रोहितनं पूर्ण संघाला चमकण्यासाठी वेगळा मंच तयार करुन दिला आहे. तो टीमचा मोठा गौरव आहे. तो फक्त कॅप्टनच नाहीतर कॅप्टन मार्व्हल आहे. सलग दहा विजय आणि आता विश्वविजेता पदापासून केवळ एक विजय दूर. अशा शब्दांत सुनील शेट्टी यांनी रोहितवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

केवळ सुनील शेट्टीच नाहीतर यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी भारतीय संघ आणि खेळाडुंची प्रशंसा केली आहे. त्यामध्ये शाहरुख खान, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ऑबेरॉय, अनुपम खेर आणि रितेश देशमुख यांच्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी भारताला शेवटच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अण्णानं जावयाची देखील केली स्तुती!

काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सुनील शेट्टीनं म्हटले होते की, मी खरं सांगतो राहुलचा तेव्हापासून फॅन आहे जेव्हा तो फक्त एक क्रिकेटर होता. आता तो माझा फक्त जावईच नाहीतर मुलगा आहे. अजूनही मी त्यांचा फॅन आहे. अशी प्रतिक्रिया सुनील शेट्टी यांनी दिली होती. त्याची सोशल मीडियावर बराचकाळ चर्चा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com