
KL Rahul Athiya Shetty Wedding : 'उद्या मी स्वतः मुलांना घेऊन येईन', सुनील शेट्टीचा मराठी अंदाज
टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. 21 जानेवारीपासून दोघांच्या लग्नाचे विधी सुरू झाले असताना शनिवारी संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते तर रविवारी हळदीचे आयोजन करण्यात आले आहे.
हे लग्न अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्म हाऊसवर होणार आहे. सततच्या लग्नाच्या चर्चेत असताना आता सुनील शेट्टी स्वत: मीडियासमोर आला आहे, जिथे त्याने मीडियाच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हेही वाचा: Vivek Agnihotri: काश्मीर फाईल्सच्या अग्नीहोत्रींचा राहुल गांधींना टोला, 'मी तर हवेतच'
खरं तर, केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाच्या ठिकाणी पत्रकारांची सतत उपस्थिती पाहून सुनील शेट्टी स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि पुढे येऊन मीडियाशी बोलले. यावेळी त्यांनी हात जोडून मीडियाचे आभार मानले आणि लग्नानंतर राहुल आणि अथियाला स्वतः मीडियासमोर आणणार असल्याचेही सांगितले. हा व्हिडिओ फिल्मी ग्यानने आणि इन्स्टंट बॉलीवूडने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सुनील शेट्टी म्हणतोय की उद्या मी मुलांना घेऊन येईन आणि तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
लग्नाची बातमी आल्यापासून प्रत्येकजण या जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या लग्नात राहुल आणि अथियाचे फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सामील आहेत, त्यानंतर लग्नाच्या ठिकाणी कोणताही फोन आणि कॅमेरा आणण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दोन्ही लव्ह बर्ड्स 23 जानेवारीला सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्म हाऊसवर लग्न करणार आहेत. ज्याची तयारी सुनील शेट्टी यांच्या देखरेखीखाली झाली आहे. पांढऱ्या फुलांनी सजलेली ही हवेली शनिवारी संध्याकाळी अतिशय सुंदर दिसत होती.