Vivek Agnihotri: काश्मीर फाईल्सच्या अग्नीहोत्रींचा राहुल गांधींना टोला, 'मी तर हवेतच' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri On Rahul Gandhi

Vivek Agnihotri: काश्मीर फाईल्सच्या अग्नीहोत्रींचा राहुल गांधींना टोला, 'मी तर हवेतच'

Vivek Agnihotri On Rahul Gandhi: राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये राहुल गांधी विमान उडवण्याबद्दल आणि पायलटच्या दृष्टिकोनाबद्दल बोलले. यासोबतच त्यांनी फ्लाइटबद्दलही सांगत आहेत. त्याचा हा व्हिडिओ शेअर करताना चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: Dipika Kakar Pregnancy: लग्नाच्या 5 वर्षांनंतर 'ससुराल सिमर का' फेम दीपिकानं दिली गुडन्यूज

यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आलंबयन यांना मुलाखत दिली होती. यादरम्यान त्यांनी विमान उडवण्याबाबतही चर्चा केली. विवेक अग्निहोत्रीने त्या मुलाखतीची 1 मिनिट 49 सेकंदांची क्लिप ट्विट केली आणि लिहिले, “My Sunday is made. मी पण उडायला सुरुवात केली आहे. आणि तूम्ही?" राहुलच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: Pathaan Controversy: आसामच्या मुख्यमंत्र्याना किंग खानचा मध्यरात्री फोन म्हणाला,..

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये राहुल गांधी विमान उडवण्याबद्दल आणि पायलटच्या दृष्टिकोनाबद्दल बोलले. आता चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टिका केली.

हेही वाचा: Pathaan: साध्वी प्राची यांना 'पठाण' ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पचेना! ट्विट करत म्हणाल्या, 'शाहरुख तू'

सध्या राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेवर आहेत जी 7 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. तर विवेक रंजन अग्निहोत्रीचा द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अनुपम खेर, नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी यात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.