
Sunil Grover : छोट्या गावातून सुनील ग्रोवर आला मुंबईत, बनला मोठा अभिनेता
सुनील ग्रोवरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने अनेक वर्षांच्या संघर्षनंतर काॅमेडीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. सुनील ग्रोवर (Sunil Grover) हा आज काॅमेडीच्या जगात डाॅ.मशहूर गुलाटीपासून, रिंकू भाभी आणि गुत्थी या नावाने ओळखला जातो. त्याने टीव्हीबरोबरच बाॅलीवूडमध्ये (Bollywood) चित्रपटांमध्ये काम केले. अक्षय कुमार, अजय देवगन आणि सलमान खानसह अनेक मोठ्या सिनेतारकांबरोबर त्यांनी काम केले. सुनील ग्रोवर आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही त्याच्या विषयीचे काही गोष्टी सांगणार आहोत. (Sunil Grover Know Him Interesting Things On His Birthday)
हेही वाचा: शाहरुख खान जादूगार आहे ! सल्ला देण्यावर आलिया भट स्पष्टच बोलली
सुरुवातीची कमाई किती?
सुनील ग्रोवर आज एका एपिसोडसाठी १० ते १२ लाखांपर्यंत फिस घेतो. मात्र एक काळ असा होता की त्याला कोणत्याही चित्रपट आणि एका सीनसाठी केवळ ५०० रुपये मिळत होते. याबाबत त्याने स्वतः सुनील ग्रोवरने सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली होती. त्याने मुंबईत चांगल्या भागात घर भाड्याने घेतले.
हेही वाचा: कंगनाची आणखी एका वादात उडी, लेखिकेला म्हणाली हिंदू विरोधी!
कपिल शर्माच्या शोमुळे प्रसिद्ध
सुनील ग्रोवरला पाहाताच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागते. कपिल शर्माच्या पहिल्या काॅमेडी नाईट्स विथ कपिल शोत त्याने गुत्थी बनवून लोकांना हसवले. दुसरीकडे 'द कपिल शर्मा शो'त तो रिंकू भाभी बनवून तर कधी डाॅ मशहूर गुलाटी हे पात्र लोकांना खूप आवडले. कपिलबरोबर झालेल्या वादानंतर सुनीलने शो सोडला.
हेही वाचा: Salman Khan : धमकीनंतर सलमान खान झाला सावध, आता चालवणार बुलेटप्रूफ कार
हृदयविकाराचा झटका
सुनील ग्रोवरचे चाहते नेहमी पडद्यावर त्याला मिस करत आहेत. त्याला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे चाहत्यांबरोबरच सिनेतारे तब्येतीसाठी प्रार्थना करत होते. सुनील ग्रोवर काही दिवस दवाखान्यात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर सुनील ग्रोवर बरा झाला. नुकताच तो अर्चना पूरण सिंह यांच्या लाफ्टर चॅम्पियन इंडियात डाॅ.मशहूर गुलाटीच्या पात्रात दिसला होता.
Web Title: Sunil Grover Know Him Interesting Things On His Birthday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..