esakal | अथिया आणि केएल राहुलच्या रिलेशनशिपबद्दल सुनील शेट्टीचे मत, म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

 athiya shetty,k l rahul, sunil shetty

अथिया आणि केएल राहुलच्या रिलेशनशिपबद्दल सुनील शेट्टीचे मत, म्हणाला...

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (sunil shetty) त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सुनीलची मुलगी अथिया (athiya shetty) देखील अभिनेत्री आहे. अथिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सध्या अथिया आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (k l rahul) रिलेशनशिपबद्दल चर्चा सुरू आहे. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणताही खुलासा केला नाही. पण अथिया आणि केएल राहुल सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो नेहमी शेअर करत असतात. या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल आता सुनील शेट्टीने त्याचे मत मांडले आहे.(sunil shetty spoken about relationship of daughter athiya shetty and cricketer k l rahul)

सुनील शेट्टीचे मत

नुकतेच एका मुलाखतीमध्ये, सुनील शेट्टीने अथिया आणि केएल राहुलच्या नात्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. अथिया आणि केएल राहूलने एका ब्रॅंडच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले. त्याबद्दल सुनील म्हणाला,'जाहिरातीबद्दल बोलायचे झाले तर, एका आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. दोघे गुड लुकिंग कपल आहे आणि ब्रॅण्डच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाले तर दोघे चांगले काम करत आहेत. माझे असे मत आहे की, दोघेही एकमेकांसोबत जाहिरातीत चांगले दिसतात.'

हेही वाचा: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील या कलाकारांना ओळखलंत का?

अथियाने 2015 साली 'हिरो' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मीती सलमान खानने केली होती. त्यानंतर तिने मुबारखा, नवाबजादे, मोती चुर चकना चुर या चित्रपटांमध्ये काम केले.

हेही वाचा: आयशा टाकिया सर्जरीमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'कोण होतीस तू, काय झालीस तू'

loading image