esakal | 'कोण होतीस तू, काय झालीस तू'; सर्जरीमुळे आयशा टाकिया ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

ayesha takia

आयशा टाकिया सर्जरीमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'कोण होतीस तू, काय झालीस तू'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकियाने (ayesha takia) चित्रपटांमधून ब्रेक घेतला असून ती सोशल मीडियावरून प्रेक्षकांच्या नेहमी भेटीस येत असते. नुकताच आयशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. आयशाच्या या व्हिडीओमध्ये तिच्या ओठांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. अनेकांनी तिच्या या व्हिडीओला कमेंट करून तिला ट्रोल केले आहे. (bollywood actress ayesha takia trolled for lip surgery)

ओठांच्या सर्जरीमुळे आयशा पुन्हा झाली ट्रोल

आयशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडीओला कमेंट करत लिहीले, 'काय झालंय तुला? कोण होती तू आणि आता काय झाली तू?', तर दुसऱ्याने लिहीले, 'सर्जरीमुळे तुमचा पुर्ण चेहरा खराब झाला आहे.' 2017 साली एका कॅफेच्या लॉन्चसाठी आयशाने उपस्थिती लावली होती. त्यावेळी लिप सर्जरीनंतर ती पाहिल्यांदाच लोकांसमोर आली होती. त्यावेळी देखील आयशाला अनेकांनी ट्रोल केले होते.

हेही वाचा: मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन; पहा दिशा परमारचे रॉयल लूक्स

एका मुलाखतीमध्ये ट्रोलिंगबद्दल आयशाने आपले मत मांडले होते. तेव्हा ती म्हणाली होती, 'कोणालाही कमी लेखू नये. आपण सर्व जण वेगळे आहोत आणि यामध्येच आपलं सौंदर्य आहे.' आयशाने 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'टारझन द वंडर कार' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने सलमान खानसोबत 'वॉन्टेड' या सुपर हिट चित्रपटामध्ये काम केले. होम डिलिव्हरी, शादी नंबर 1, सलाम ऐ इश्क या चित्रपटांमध्ये आयशाने काम केले.

हेही वाचा: 'देवमाणूस' मालिकेतील सरू आजींच्या म्हणीवरून वाद; निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

loading image