Sunita Documentary : स्मशानातील भयानक वास्तव दाखवणारी 'सुनिता'

ज्या वेळी मयत बापाच्या मृतदेहाला हात लावायला पोटचा लेक धजावत नव्हता त्यावेळी पुढे आल्या सुनिता पाटील.
Sunita Documentary
Sunita Documentary Sakal

जागतिक महामारी! कोरोना! नाव ऐकलं तरी अंगावर शहारे येतात. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वेगाने माणसं जात होती. कोरोनाकडे वयोगटाचे फिल्टर नव्हते. अगदी नवजात बाळापासून खंगाळलेल्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना कोरोनाचं बळी व्हावं लागलं होतं. कधीकाळी समाजात प्रतिष्ठित असणाऱ्या लोकांच्या मृतदेहाजवळ कुणीही फिरकत नव्हतं. मयताला येणारे लोकं म्हणजे आपण आयुष्यातील कमावलेली संपत्ती असं म्हातारी माणसं बोलून जातात पण अशा कित्येक श्रीमंत व्यक्तीच्या मयतीला घरातले व्यक्तीसुद्धा नव्हते. कोरोनाकाळातलं हे भयानक वास्तव 'सुनिता' या माहितीपटात दाखवलं गेलंय.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

स्मशानात काम करणाऱ्या सुनिता पाटील
स्मशानात काम करणाऱ्या सुनिता पाटीलSakal

'सुनिता...केरिंग ऑफ फँटम' नावाचा माहितीपट दिग्दर्शक दिग्विजय सुलोचना यादवराव यांनी बनवला आहे. तर 'दिसुया' प्रोडक्शनची निर्मीती असलेल्या माहितीपटाचे निर्माते अमोल कुमावत आणि दिग्विजय सुलोचना यादवराव हे आहेत. सारंग कुलकर्णी यांनी या माहितीपटाचे संगीत केलं असून आत्तापर्यंत अनेक पुरस्काराने या माहितीपटाला सन्मानित केलं आहे. तर नाशिक येथील एका स्मशानभूमीत काम करणाऱ्या सुनिता पाटील यांच्या कोरोनाकाळातील भयानक अनुभव या माहितीपटात मांडला आहे.

ज्या वेळी मयत बापाच्या मृतदेहाला हात लावायला पोटचा लेक धजावत नव्हता त्यावेळी पुढे आल्या सुनिता पाटील. जे काम सामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही ते काम सुनीता गेले 18 वर्ष नाशिकमध्ये करतायेत. कोरोनाकाळातील स्मशानातील धगधगतं वास्तव दाखवणारा दिग्विजय सुलोचना यादवराव यांचा हा माहितीपट युट्यूब, Varivas आणि MX Player या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. SHOOTBEET या युट्यूब चॅनेलवर हा माहितीपट आपण पाहू शकता.

Sunita
SunitaSakal
Sunita Documentary
Ravish Kumar : रविश कुमारांचे मराठी कनेक्शन; दगडूशेठ गणपती दर्शनानंतर मराठीतील Video Viral

'सुनीता... केरिंग ऑफ फँटम'ला मिळालेली पुरस्कार

1. 11th Dada saheb Phalke film festival - 2021

Best Documentary Jury

2. 7Colors International Film Festival - 2021

Honorable Mention Best Documentary

3. Nawada International Film Festival - 2021

Best Aspiring Filmmaker

4. Global Indie Film Festival - 2021

Winner Best Documentary

5. Cochin International Film Festival - 2020

Best Documentary

6. South Indian International Film Award - 2020

Honorable Jury Mention Documentary

7. Vocal For Local Film Fest - 2021

Best Documentary Film

8. Asian International Film Festival

Best Cinematography Award

9. Reels International Film Festival - 2021

1st Award Best Director Of Photography

10. Bettiah International Film Festival - 2020

3rd Best Documentary Film

11. First Step National Short Film Festival - 2021

2nd Best Film

12. 4th South Asian Short Film Festival - 2021

Satyajit Ray Bronze Award

3rd Best Documentary

13. Pune Short Film Festival - 2021

Official Selection

14. Independent Video Film Festival of Youtube Art Club Pavlos Paraschakis,Greece - 2022

Official Selection

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com