esakal | सनीच्या मुलीने जिंकले लोकांचे मन; व्हिडीओ झाला व्हायरल  
sakal

बोलून बातमी शोधा

sunny leone daughter nisha hug daddy daniel weber cutest video currently winning hearts.jpg

नुकताच सनीची मुलगी निशाचा एअरपोर्टवरील  व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये निशाची निरागसता आणि गोंडस भाव दिसत आहेत.

सनीच्या मुलीने जिंकले लोकांचे मन; व्हिडीओ झाला व्हायरल  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फॅमिलीचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सनीच्या मुलांचे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.

नुकताच सनीची मुलगी निशाचा एअरपोर्टवरील  व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये निशाची निरागसता आणि गोंडस भाव दिसत आहेत. सनी लिओन 'एमटीवी स्लिट्सविला 13' या रियालिटी शोच्या शूटिंगसाठी तिच्या तिन्ही मुलांसोबत केरळमध्ये गेली होती. शूटिंगपूर्ण करून ती मुबंईत परत आली. यावेळी एअरपोर्टवर सनीचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर उपस्थित होते.

सनी आणि मुलांना घेण्यासाठी सनीचे पती डेनिअल एअरपोर्टवर आले होते. त्यावेळी एरपोर्टवर आपल्या वडिलांना पाहून निशाला खूप आनंद झाला. निशीने डेनियलला खट्ट मिठी मारली. वडिल आणि मुलीच्या प्रेमळ नात्याला एअरपोर्टवरील फोटोग्राफर्सने कॅमेऱ्यात कैद केले.  बापलेकीच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काही वर्षांपूर्वी अनाथ मुलगी म्हणून निशाला सनीने आणि डेनियलने दत्त घेतले. त्यानंतर सरोगसीद्वारे त्यांना दोन मुलं झाली त्यांच नाव अशेर आणि नोह आहे. आता सनीला आणि डेनियलला तीन मुले आहेत. डेनियल आणि मुलांसोबतचे फॅमिली फोटो सनी नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. सनीचे 2011सली डेनीयल सोबत लग्न केले. त्याआधी अनेक वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते.

loading image