लैंगिक गैरवर्तनानंतर अभिनेत्रीला आठव्या मजल्यावरून ढकललं; सनीकडून मदतीचं आवाहन

वृत्तसंस्था
Sunday, 7 July 2019

अल्पवयीन अभिनेत्रीशी लैंगिक गैरवर्तन करून तिला आठव्या मजल्यावरून ढकलल्याची घटना घडल्याचे नकतेच समोर आले आहे. या अभिनेत्रीच्या उपचारासाठी तिला आर्थिक मदत करण्याचं आवाहन अभिनेत्री सनी लिओनीनं सोशल मीडियावरून केलं आहे.

मुंबई : अल्पवयीन अभिनेत्रीशी लैंगिक गैरवर्तन करून तिला आठव्या मजल्यावरून ढकलल्याची घटना घडल्याचे नकतेच समोर आले आहे. या अभिनेत्रीच्या उपचारासाठी तिला आर्थिक मदत करण्याचं आवाहन अभिनेत्री सनी लिओनीनं सोशल मीडियावरून केलं आहे.

या मुलीला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. मी तिला ओळखत नाही पण तिच्यासोबत घडलेली घटना ऐकून माझं मन हेलावलं. तुम्हाला आर्थिक मदत करणं शक्य नसल्यास ही पोस्ट शेअर करा. या तरुणीसोबत लैंगिक गैरवर्तन करून 29 जून रोजी तिला इमारतीच्या आठव्या मजल्यावरून ढकलून देण्यात आलं आहे. तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी तिला आठ लाख रुपयांचा खर्च येत आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hi everyone. This girl needs help to live. I don’t know her but her case was brought to my attention and it’s heart breaking. If you can find it In your heart to help it would be amazing. If not with money then forward the message to spread the word. In an unspeakably vicious act, Namra was sexually molested before being thrown off the 8th floor of a building on 29th June. She suffered multiple brain injuries and is fighting for her life at L H Hiranandani Hospital,Mumbai.The treatment is going to cost Rs. 8 lakh, and we urgently need funds to continue the treatment and save her life. We are trying our best to arrange the funds, but are limited by our financial condition, and time is running out for Namra. Please help us raise the required amount by donating. Check my story for the link

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

आम्ही पैसे उभारण्यासाठी प्रयत्न करतच आहोत. पण वेळ कमी आहे. तुम्हीसुद्धा मदत करा अशी विनंती, असं सनीने पोस्टमध्ये लिहिलं. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत सनीने तिला मदतीचं आवाहन केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Leone urges fans on social media to help sexual assault victim