सनी लिओनी अडकली कपड्यात...

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

सनी लिओनीच्या चाहत्यांना हे छायाचित्र आवडले असून, या छायाचित्रावर हजारो प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत.

मुंबईः अभिनेत्री सनी लिओनीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर छायाचित्र शेअर केले आहे. तिने म्हटले आहे की, 'मी पण तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. मला असे वाटले होते की हे जुने कपडे मला बसतील. पण तसे झालेच नाही.' सनीच्या चाहत्यांना हे छायाचित्र आवडले असून, या छायाचित्रावर हजारो प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I’m just like some of you out there. I’m delusional that it might just fit!!! NOPE...not happening!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

दरम्यान, सनी लिओनी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असले. तिचे व्हिडिओ, छायाचित्र मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतात. गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱया अभिनेत्रींमध्ये सनी लिओनीचे नाव आहे. सनी लिओनी लवकरच 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करत आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. 'रंगीला' या चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहे. शिवाय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunny leony shares her new photo on instagram