esakal | २० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिल्या गेलेल्या सनी लिओनीच्या 'या' व्हिडिओमध्ये असं काय खास आहे?
sakal

बोलून बातमी शोधा

sunny leone

सनीचे प्रत्येक व्हिडिओ लाखोजण पाहतात मात्र सनीचा असा एक व्हिडिओ आहे जो आत्तापर्यंत २० लाख पेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये काहीतरी नक्कीच खास आहे.

२० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिल्या गेलेल्या सनी लिओनीच्या 'या' व्हिडिओमध्ये असं काय खास आहे?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन वेगवेगळ्या त-हेने करायचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ती म्हणजे सनी लिओनी. कधी व्हिडिओ चॅट करुन मराठी शिकते कधी चपाती आणि जलेबी डान्स करते तर कधी बोट कापल्याचं प्रँक करत सगळ्यांना हसवते. सनीचे प्रत्येक व्हिडिओ लाखोजण पाहतात मात्र सनीचा असा एक व्हिडिओ आहे जो आत्तापर्यंत २० लाख पेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये काहीतरी नक्कीच खास आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री पूनम पांडेला खरोखर अटक? वाचा स्वतःच्याच अटकेबाबत व्हिडिओ शेअर करत पूनम काय म्हणाली..

सनी लिओनी लॉकडाऊनमध्ये स्वतःची फिगर मेंटेन ठेवण्यासाठी वर्कआऊट करत असते मात्र यावेळी तीने वर्कआऊट करताना जरा पुढचा टप्प्याचा आधार घेतला आहे.
सनीने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सनीने १० किलो वजन असलेलं शर्ट घातलंय..विशेष म्हणजे हे शर्ट घालून तिने मुलाला स्ट्रॉलरमध्ये ठेवलंय आणि ती जॉगिंग करताना दिसतेय. 

२० लाखापेक्षा जास्त वेळा पाहिल्या गेलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहिलंय, वजनी वर्कआऊट, १० किलो जास्त वजन अंगावर घेऊन स्ट्रॉलरला ढकलत मी धावत आहे. लॉकडाऊनमधील आयुष्य.सनी लिओनीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडतोय. तिच्या लाखो चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर ते कमेंट देखील करत आहेत. आत्तापर्यंत हा व्हिडिओ २३ लाखपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. सनीने याआधी देखील अतरंगी व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांच मनोरंजन केलं होतं.

काही दिवसांपूर्वी सनीला पती डेनिअलने लादी पुसण्यासाठी सांगितलं होतं तेव्हा सनीचा लादी पुसतानाचा ग्लॅमरस अंदाज पाहून सारेच चक्राऊन गेले होते.. सनीने लादी पुसताना शॉर्ट कपडे घातले होते इतकंच नाही तर सनी पूर्ण तयार होऊन तिच्या हटके अंदाजात लादी पुसताना दिसून आली होती.   

sunny loene workout video in 10 kg t shirt video goes viral