महानायक पुन्हा शूटींगसाठी सज्ज! सोशल मीडियावर शेअर केला फोटो

संतोष भिंगार्डे
Monday, 24 August 2020

महानायक अमिताभ बच्चन यांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती 12' या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचले आहेत

मुंबई ः महानायक अमिताभ बच्चन यांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती 12' या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात बिग बींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना जवळजवळ २२ दिवस नानावटी रुग्णालयात दाखल केले गेले, त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आणि आता ते पुन्हा शूटिंग करायला सज्ज झाले आहेत. 

सलमान खानने लाडक्या भाच्यासोबत केली बाप्पाची आरती, सोबत दिसली युलिया वंतुर - 

अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून केबीसी 12 च्या सेटवर आपण परत आल्याची बातमी दिली. त्यांनी 'हॉटसीट'वर बसलेला त्यांचा एक फोटो पोस्ट केला. तसंच इन्स्टाग्रामवर त्यांनी तंत्रज्ञ मंडळींचा एक फोटो शेअर केला. ज्यात सगळे जणं मास्क आणि पीपीई किट घालून घालताना कॅमेरे हाताळताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर जाऊन शेअर केले की, "कौन बनेगा करोडपती 12 ची सुरूवात झाली आहे. मी पुन्हा एकदा केबीसी 12 च्या सेटवर असून काम करण्यासाठी तयार आहे." दरम्यान, इन्स्टाग्रामवर त्यांनी लिहिले, "मी पुन्हा निळ्या पीपीईच्या समुद्रात म्हणजेच केबीसी 12 च्या सेट वर आलो आहे. केबीसी ची सुरुवात 2000 साली झाली आणि आज 2020 साली याला 20 वर्षे झाली ! हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव आहे ! "

  कपूर खानदानातील आता या स्टारकिडची होणार बॉलीवूडमध्ये एंट्री - 

यापूर्वी लॉकडाऊन काळात अमिताभ बच्चन यांनी 'केबीसी 12' च्या प्रोमोसाठी शूट केले होते. आता या सिझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. लवकरच हा नवा सिझन घेऊन बच्चनजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superhero ready for re-shooting! Photo shared on social media