महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केला विठ्ठल-रखुमाईचा फोटो...

संतोष भिंगार्डे
Friday, 17 July 2020

गेल्या शनिवारी (ता.11) अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची माईल्ड लक्षणं असून त्यांची तब्येत सुधारत आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सध्या विलेपार्ले येथील  नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, यानंतर ते सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत आणि त्याच्या तब्येतीबाबत वेळोवेळी आपल्या सगळ्यांना अपडेट देत आहेत. 

धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक

अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी दुपारी विठ्ठल आणि रखुमाईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ''त्वमेव माता च पिता त्वमेव ; त्वमेव बंधुश च सखा त्वमेव; त्वमेव विद्या द्रविनम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव.'' या पोस्टला कमेंट करून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

तसेच गुरुवारी त्यांनी विदूर नीतीचे श्लोक शेअर केले. अमिताभ यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लिहिले की, 'ईर्ष्यी घृणी त्वसंतुष्ट: क्रोधनो नित्यशड्कितः। परभाग्योपजीवी च षडेते दुखभागिनः।। म्हणजेच सर्वाची ईर्ष्या, घृणा करणारे, असंतोषी, क्रोधी, नेहमी संशय घेणारे, इतरांच्या आधारे जगणारे अशा सहा प्रकारचे लोक नेहमी दुःखी असतात. अशा लोकांपासून दूर राहायला हवे.

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती होतेय कमी, होय 'हे' आता सिद्ध झालंय...

गेल्या शनिवारी (ता.11) अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची माईल्ड लक्षणं असून त्यांची तब्येत सुधारत आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून चाहत्यांनी दिलेल्या शुभेछा आणि प्रेम यांसाठी त्यांना धन्यवादही दिले.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superstar Amitabh Bachhan shares pics of Vitthal and Rakhumai on social media