Rajinikanth health update: सुपरस्टार रजनीकांत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Rajinikanth
Rajinikanth

हैदराबाद : रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने आणि थकवा आल्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलायवा उर्फ सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना २५ डिसेंबर रोजी हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांची एक टीम गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करत होती. 

“त्यांचा रक्तदाब नियमित झाला असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्यांना आज बरे वाटत असल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला,”असे हॉस्पिटलने आपल्या निवेदनात म्हटले आहे, पण त्यांचा रक्तदाब नियमित तपासला जाणार असून त्यांना आठवडाभर आराम (बेड रेस्ट) करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना कमीतकमी शारीरिक हालचाल करण्यास सांगितले असून कोणताही ताणतणाव घ्यायचा नाही, अशी ताकीद दिली आहे. कोविड-१९च्या संसर्गाची शक्यता वाढेल, अशा कोणत्याही कारणांपासून स्वत: दूर राहावे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. 

दरम्यान, थलायवा रजनीकांत गेल्या १० दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. सेटवरील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रजनीकांत यांनी पहिल्यापासून खबरदारी बाळगल्याने त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.  

टीडीपी सुप्रीमो आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे राज्यपाल तमिळसाई सौंदराजन, अभिनेता आणि आता राजकारणात उडी घेतलेले कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली होती. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत तमिळनाडूमध्ये स्वत:च्या राजकीय पक्षाचा जम बसवण्यात व्यस्त आहेत. या महिना अखेरीस ते आपल्या राजकीय अजेंड्याबद्दल अधिक माहिती देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com