रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांचा मार्ग मोकळा तर मुंबई पोलिसांनी ३ दिवसात चौकशी अहवाल प्रस्तुत करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 5 August 2020

सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दाखल केलेला अंतर्गत संरक्षणाचा अर्ज देखील फेटाळून लावली आहे. त्यामुळे बिहार पोलीस आता रियाची चौकशी करु शकतात. 

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणात आता सीबीआय तपासासाठी परवानगी दिली आहे.  तसंच नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दाखल केलेला अंतर्गत संरक्षणाचा अर्ज देखील फेटाळून लावली आहे. त्यामुळे बिहार पोलीस आता रियाची चौकशी करु शकतात. 

हे ही वाचा: अमिताभ यांच्या कोरोना आणि कुली अपघाताशी संबधित 'हा' आहे मोठा योगायोग...

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सध्याची मोठी अपडेट ही आहे की केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस स्विकारत सीबीआय तपासासाठीचा मार्ग मोकळा केला आहे. तर दुसरीकडे सुप्नीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दाखल केलेला अंतर्गत संरक्षणाचा अर्ज देखील फेटाळून लावला आहे. कोर्टाचं म्हणणं आहे की सुशांतसारख्या हुशार अभिनेत्याचा अनैसर्गिक मृत्यु झाला आहे. सत्य सगळ्यांसमोर आलं पाहिजे. तेव्हा आता बिहार पोलीस देखील रियाची चौकशी करु शकतात. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाने सिनियर पोलीस ऑफीसर यांना क्वारंटाईन केल्याबद्दलही फटकारलं आहे. कोर्टाचं म्हणणं आहे की सिनियर ऑफीसरला क्वारंटाईन केल्यामुळे जनमानसात चुकीचा संदेश गेला आहे. कोर्टाने यावर महाराष्ट्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीनंतर रिया चक्रवर्तीचे वकिल सतीश मानशिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की 'कोर्टाच्या या सुनावणीवर ते समाधानी आहेत. त्यांनी म्हटलंय की जसं की हे प्रकरण अजुन प्रलंबित आहे तेव्हा यावर त्यांची क्लाइंट रिया कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.' आता रियाच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होईल.

सुप्रीम कोर्टाने या दरम्यान सगळ्या विभागांना त्यांचं उत्तर देण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना हे देखील सांगितलं आहे की या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे तो चौकशी अहवाल देखील या तीन दिवसांच्या आत प्रस्तुत करावा. एक आठवड्यानंतर यावर सुनावणी केली जाईल.   

supreme court denies interim protection for rhea chakraborty from questioning  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court denies interim protection for rhea chakraborty from questioning