esakal | अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा झटका
sakal

बोलून बातमी शोधा

zund film

काही महिन्यांपूर्वी हा सिनेमा कायदेशीर बाबींमध्ये अडकल्याने या सिनेमाच्या रिलीजवर स्टे आणण्यात आला होता. याचसंदर्भात आता नवीन अपडेट अशी समोर येत आहे की सुप्रीम कोर्टाने बुधवारी या सिनेमाच्या रिलीजवरील प्रतिबंध हटवण्यास नकार दिला.

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा झटका

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडचे अनेक सिनेमे सध्या चर्चेत आहेत. त्यातंच आता अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड' हा सिनेमा चर्चेत आलाय. काही महिन्यांपूर्वी हा सिनेमा कायदेशीर बाबींमध्ये अडकल्याने या सिनेमाच्या रिलीजवर स्टे आणण्यात आला होता. याचसंदर्भात आता नवीन अपडेट अशी समोर येत आहे की सुप्रीम कोर्टाने बुधवारी या सिनेमाच्या रिलीजवरील प्रतिबंध हटवण्यास नकार दिला. यासोबतंच तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेली याचिका देखील फेटाळून लावली. कनिष्ठ न्यायालयाने कॉपीराईटच्या वादामुळे या सिनेमाच्या रिलीजवर प्रतिबंध लावला आहे.

हे ही वाचा: सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, सलमानने स्वतःला केलं आयसोलेट  

सरन्यायाधिश एस ए बोबडे, न्यायमुर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमुर्ती वी रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या १९ ऑक्टोबरच्या निर्णयाविरोधात टी सिरीजची याचिका फेटाळून लावली. झुंडच्या रिलीजवर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या मनाई आदेशमध्ये हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. या संदर्भात विशेष अनुमती याचिका फेटाळून लावल्या आहेत. यासंबंधित अन्य जर काही प्रलंबित अर्ज असतील तर ते निकाली काढले आहेत असे समजावे, असंही खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' हा सिनेमा बिगर सरकारी संस्था स्लम सॉकरचे संस्थापक विजय बर्से यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याच महिन्यात रिलीज होणार होता. याआधी हा सिनेमा मे महिन्यात रिलीज होणार होता. मात्र कोविडच्या संकटामुळे ही रिलीज पुढे ढकलण्यात आली. हैद्राबाद येथील रहिवासी असलेले लघु सिने निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी 'झुंड' सिनेमाच्या निर्मात्यांवर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा आरोप लावला होता. मात्र निर्मात्यांनी हे आरोप फेटाळून लावले. 

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने सांगितलं की 'याची सुनावणी सहा महिन्यांच्या आत पूर्ण केली जावी.' यावर सिने निर्मात्यांच्या वकिलाने म्हटलं की 'सहा महिन्यात हा सिनेमा बेकार होऊन जाईल आणि ते या व्यक्तीला पैसे देण्यासाठी तयार आहेत. त्यांनी सांगितलं की दोन्ही पक्षांमध्ये १ कोटी ३ लाखांवर सहमती देखील झाली होती.'    

supreme court refuses to lift stay on release of amitabh bachchan film jhund  

loading image