'जय भीम' चित्रपटाचा वाद; सूर्याच्या घराबाहेर पोलीस संरक्षण | Jai Bhim | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Bhim Film

'जय भीम' चित्रपटाचा वाद; सूर्याच्या घराबाहेर पोलीस संरक्षण

अभिनेता सूर्याची Suriya मुख्य भूमिका असलेला 'जय भीम' Jai Bhim हा चित्रपट वादात सापडला आहे. वन्नियार समुदायाने चित्रपटात त्यांची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर आता सूर्याच्या चेन्नईतील निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांचा 'जय भीम' हा चित्रपट ९०च्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.

चित्रपटात सूर्यानं खऱ्या आयुष्यातील वकील चंद्रु यांची भूमिका साकारली आहे. चंद्रु यांनी एक पैसाही न आकारता अत्याचारितांसाठी लढण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. 'जय भीम'मधील काही दृश्यांमुळे आपल्या समुदायाची प्रतिमा कशा पद्धतीने मलिन झाली, याबद्दल वन्नियार समुदायाने सोमवारी अभिनेता सूर्याला कायदेशीर नोटीस बजावली. नोटिशीनंतर सूर्याला धमक्याही मिळाल्या. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्याच्या निवासस्थानाबाहेर पाच पोलीस कर्मचारी शस्त्रांसह तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा: 'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

या चित्रपटामध्ये सूर्यासोबतच लिजोमोल जोस, के मणिकंदन, राजिशा विजयन, राव रमेश आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत. आदिवासी लोकांची जीवनशैली, त्यांचा जीवनक्रम, अजूनही त्यांना दोनवेळच्या भाकरीसाठी करावा लागणारा संघर्ष, आपण भलं न् आपलं काम भलं यानुसार काम करणाऱ्या त्या जमातीच्या वाट्याला येणाऱ्या वेदना दिग्दर्शकानं कमालीच्या संयतपणे पडद्यावर साकारल्या आहेत.

loading image
go to top