'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा | Vikram Gokhale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale

'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने Kangana Ranaut केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभर तीव्र पडसाद उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांनी रविवारी तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला. कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केलं. स्वातंत्र्य मिळवण्यााचा प्रयत्न करणाऱ्या योद्धांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. विक्रम गोखलेंच्या या विधानावरून मत-मतांतरे होत असताना त्यांच्यासोबत भविष्यात कामच करणार नसल्याचं मराठी निर्माते निलेश नवलाखा यांनी जाहीर केलं.

'मी विक्रम गोखलेंबरोबर काम केलं आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना राणावत जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,' असं ट्विट नवलाखा यांनी केलं.

हेही वाचा: अतुल कुलकर्णीचा मोजक्या शब्दांत विक्रम गोखलेंना टोला?

विक्रम गोखले यांनी सकाळ डिजिटलशी बोलताना कंगनाबद्दलच्या वक्तव्याबाबत स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले, "मीडियानं माझी उगाच नाचक्की केली. स्वातंत्र्याचा इतिहास मला माहित आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. पुराव्याशिवाय मी बोलत नाही. कंगना जे बोलली त्यात चुकीचं काय? माझ्याकडे पंडित नेहरुंचं एक पत्र आहे. हे पत्र त्यांनी माऊंट बॅटन यांना लिहिलं होतं."

loading image
go to top