श्रध्दा, सारा तुम्ही सुशांतची चेष्टा चालवली आहे, सुशांतचा मिञ युवराज सिंगने केली टीका

Yuvraj Singh, a friend of Sushant, has slammed the two actresses for their statements. He accused Shraddha and Sara of “passing the buck.” In an interview.jpg
Yuvraj Singh, a friend of Sushant, has slammed the two actresses for their statements. He accused Shraddha and Sara of “passing the buck.” In an interview.jpg

मुंबई - सुशांतच्या आत्महत्येचा तपास वेगवेगळया पध्दतीने सुरु असताना त्यावरुन उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. बॉलीवुडच्या अनेक कलावंतांना एनसीबीकडुन तपासासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी श्रध्दा कपुर आणि सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन त्यांना वादाला सामोरी जावे लागत आहे. 

सुशांतचा मिञ युवराज सिंग याने त्या दोघींनी दिलेल्या उत्तरावरुन कानउघाडणी केली आहे. सारा आणि श्रध्दा तुम्ही दोघींनी सुशांतची चेष्टा चालवली आहे. सुशांत हा ड्रग घेत होता असे वक्तव्य साराने केले होते. तर श्रध्दाच्या बोलण्यातुनही तो ड्रग्ज घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युवराज म्हणाला, त्या दोघीही चुकीची माहिती पसरवत आहेत. ते तो ड्रग्ज घेत होता असे सांगुन त्याला दोषी ठरवत आहेत. या दोघींनी काय केले नसेल तर त्यांनी किमान सुशांतबद्दल वाईट सांगु नये. अजुन तपास सुरु आहे.  त्या दोन्ही अभिनेञींना माहिती आहे की, आपण जर ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळलो तर एनडीपीएस कायद्यानुसार होणारी शिक्षेची त्यांना भीती आहे. म्हणुन त्या अशा प्रकारची माहिती पसरवत आहे.

सुशांत केसचा तपास अनेक घटना, संदर्भ यामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्यात बाँलीवुडच्या कलाकारांचा असणारा सहभाग ड्रग्जच्या प्रकरणावरुन पुढे येत आहे. आतापर्यत १४ जणांना एनसीबीकडुन नोटीस पाठविण्यात आली आहे. आतापर्यत १४ जणांना एनसीबीकडुन समन्स पाठविण्यात आले आहे. यात दिपिका पदुकोण, सारा अली खान, रेहा चक्रवर्ती, सँम्युएल मिरांडा, जया साहा, दिया मिर्झा, करिश्मा प्रकाश, रकुल प्रित सिंग, श्रध्दा कपुर, शोविक चँटर्जी, श्रृती मोदी, दीपेश सावंत, सिमोन खंबाटा आणि ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यापुढील काळात आणखी ५० कलाकारांची नावे एनसीबीकडे तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुशांत केसचा तपास अनेक घटना, संदर्भ यामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्यात बाँलीवुडच्या कलाकारांचा असणारा सहभाग ड्रग्जच्या प्रकरणावरुन पुढे येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com